आपल्या पोर्टफोलिओमध्ये सोने आणि चांदीची गुंतवणूक जोडण्यासाठी एक स्मार्ट आणि खर्चिकदृष्ट्या किफायतशीर मार्ग
| ॲक्सिस गोल्ड अँड सिल्व्हर पॅसिव्ह FoF (फंड ऑफ फंड्स) – ठळक वैशिष्ट्ये● वर्ग : कमोडिटी-आधारित FoF (देशांतर्गत)● योजनेचा प्रकार: ओपन-एंडेड फंड ऑफ फंड्स योजना; गोल्ड व सिल्व्हर ETF युनिट्समध्ये गुंतवणूक● बेंचमार्क: देशांतर्गत सोन्याची किंमत आणि देशांतर्गत चांदीची किंमत (50:50)● एनएफओ कालावधी: 10 डिसेंबर 2025 ते 22 डिसेंबर 2025● फंड व्यवस्थापक: श्री. प्रतीक तिब्रेवाल आणि श्री. आदित्य पगारिया● किमान अर्ज रक्कम: ₹100 आणि त्यानंतर ₹1 च्या पटीत● एक्झिट लोड:○ अलॉटमेंट तारखेपासून 15 दिवसांच्या आत रिडेम्प्शन/स्विच आउट केल्यास: 0.25%○ 15 दिवसांनंतर रिडेम्प्शन/स्विच आउट केल्यास: शून्य |
मुंबई,: देशातील आघाडीच्या मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांपैकी एक असलेल्या ॲक्सिस म्युच्युअल फंडने आज ॲक्सिस गोल्ड अँड सिल्व्हर पॅसिव्ह फंड ऑफ फंड (FoF) सुरू करण्याची घोषणा केली. ही ओपन-एंडेड फंड ऑफ फंड्स योजना असून, त्यामध्ये सोने आणि चांदीच्या एक्स्चेंज ट्रेडेड फंड्स (ETF) च्या युनिट्समध्ये गुंतवणूक केली जाणार आहे. या योजनेचा न्यू फंड ऑफर (NFO) सबस्क्रिप्शनसाठी 10 डिसेंबर 2025 रोजी खुला होणार असून तो 22 डिसेंबर 2025 रोजी बंद होईल. ॲक्सिस गोल्ड अँड सिल्व्हर पॅसिव्ह FoF याद्वारे गुंतवणूकदारांना एकाच गुंतवणूक पर्यायातून सोने आणि चांदी—जगभरात मूल्य साठवणुकीचे विश्वासार्ह माध्यम मानले जाणारे दोन प्रमुख कमोडिटीज—यांच्या कामगिरीत सहभागी होता येणार आहे. ही योजना पारदर्शक आणि सोयीस्कर पद्धतीने कमोडिटी गुंतवणुकीची संधी उपलब्ध करून देईल. या योजनेत प्रामुख्याने गोल्ड ETF आणि सिल्व्हर ETF च्या युनिट्समध्ये गुंतवणूक केली जाणार असून, दोन्ही कमोडिटीजमध्ये संतुलित वाटप (बॅलन्स्ड अलोकेशन) ठेवण्यावर भर दिला जाणार आहे.
योजनेच्या शुभारंभाबाबत बोलताना, बी. गोपकुमार, व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी (एमडी अँड सीईओ), ॲक्सिस एएमसी, यांनी सांगितले, “सोने आणि चांदी या ऐतिहासिकदृष्ट्या महागाई आणि चलनातील चढ-उतारांपासून संरक्षण देणाऱ्या प्रभावी गुंतवणूक ठरल्या आहेत. त्याचबरोबर, पोर्टफोलिओमध्ये विविधीकरणाचे फायदेही देतात. ॲक्सिस गोल्ड अँड सिल्व्हर पॅसिव्ह FoF च्या माध्यमातून आम्ही गुंतवणूकदारांना भौतिक स्वरूपात धातू ठेवण्याच्या गुंतागुंतीशिवाय, या मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणूक करण्याचा एक सोपा आणि खर्चिकदृष्ट्या किफायतशीर पर्याय उपलब्ध करून देत आहोत.”
पोर्टफोलिओमध्ये कमोडिटीज का महत्त्वाच्या ठरतात
सोने आणि चांदीसारख्या कमोडिटीज पोर्टफोलिओच्या विविधीकरणात ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची भूमिका बजावत आल्या आहेत. पारंपरिक मालमत्ता वर्गांशी (उदा. इक्विटी व कर्जरोखे) कमोडिटीजचे सहसंबंध साधारणतः कमी असतात. त्यामुळे महागाई, चलनमूल्य घट आणि बाजारातील अस्थिरता यापासून संरक्षण देण्यासाठी त्या प्रभावी हेज ठरतात. सोने हे सुरक्षित गुंतवणूक म्हणजेच सेफ-हेवन ॲसेट म्हणून ओळखले जाते, तर चांदीमध्ये मौद्रिक मूल्याबरोबरच औद्योगिक वापरामुळे असलेली मागणी यांचा संगम आहे. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूक धोरणांना चांदी एक वेगळा आणि उपयुक्त परिमाण प्रदान करते.
पोर्टफोलिओमध्ये कमोडिटीजचा समावेश केल्यास विविधीकरण साध्य होते आणि अनिश्चित आर्थिक चक्रांच्या काळात पोर्टफोलिओची स्थैर्य क्षमता वाढते. मात्र, भौतिक स्वरूपात कमोडिटीजमध्ये थेट गुंतवणूक करणे अनेकदा किचकट, खर्चिक आणि व्यवस्थापनाच्या दृष्टीने आव्हानात्मक ठरते. याठिकाणी फंड ऑफ फंड्स (FoF) मार्गे पॅसिव्ह गुंतवणूक ही एक प्रभावी उपाययोजना ठरते. ही पद्धत भौतिक मालकीशी संबंधित ऑपरेशनल गुंतागुंतीशिवाय सोप्या, पारदर्शक आणि खर्चिकदृष्ट्या किफायतशीर गुंतवणुकीची संधी देते. तसेच, गुंतवणूक वाटपात मानवी पक्षपात दूर ठेवत बेंचमार्कशी सुसंगत, शिस्तबद्ध गुंतवणूक दृष्टीकोन प्रदान करते.
ॲक्सिस गोल्ड अँड सिल्व्हर पॅसिव्ह FoF
ॲक्सिस गोल्ड अँड सिल्व्हर पॅसिव्ह FoF ही ओपन-एंडेड फंड ऑफ फंड्स योजना असून, त्यामध्ये प्रामुख्याने गोल्ड ETF आणि सिल्व्हर ETF च्या युनिट्समध्ये गुंतवणूक केली जाणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना एकाच उत्पादनातून सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये एक्स्पोजर मिळणार आहे. या योजनेची कामगिरी देशांतर्गत सोन्याची किंमत आणि देशांतर्गत चांदीची किंमत या दोन्हींच्या समान वाट्याच्या (50:50) बेंचमार्कशी तुलना केली जाणार असून, यातून योजनेचा संतुलित गुंतवणूक दृष्टीकोन स्पष्ट होतो. या फंडचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सुलभ उपलब्धता. एनएफओदरम्यान किमान अर्ज रक्कम केवळ ₹100 असल्याने, विविध प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी ही योजना योग्य ठरते. या योजनेचे संयुक्तपणे व्यवस्थापन श्री. प्रतीक तिब्रेवाल आणि श्री. आदित्य पगारिया करतील.

