पुणे – महापालिका निवडणुकीचे अर्ज भरण्यापूर्वी अनेक माजी नगरसेवक , इच्छुक यांच्याकडून गेल्या महिनाभरापासून मतदारांना उत्तुंग भराऱ्या घ्यायला लावणाऱ्या सहली , आणि कार्यक्रमांचे आयोजने दिमाखात मंत्री महोदयांच्या उपस्थितीत होत असून आज असाच एक पण लक्षवेधी ठरेल असा कार्यक्रम दक्षिण पुण्यातील अजितदादा यांच्या राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक, नगरसेविका असलेल्या दाम्पत्याचे सुपुत्र जे निवडणूक लढविणार आहेत , त्यासाठी उमेदवारी मागत आहेत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजन करण्यात आले आहे. जो सायंकाळी ५ वाजता होत आहे . दोघांना दुबई ची सहल, ९ जणांना ज्युपिटर, या शिवाय LED टीव्ही , फ्रीज , वाशिंग मशीन ,साड्या , कुलर, शेगड्या अशी बक्षिसांची मोठ्ठी लय लुट ठेवण्यात आली आहे. प्रभाग ३९ मध्ये सुपर पाण्याचे टाकी समोरील मैदान, अप्पर डेपो येथे आज हा लकी ड्रो काढण्यात येणार आहे.
दरम्यान प्रभाग ३६ मधून अनेक सहली गेल्या असून आता एका ने घरोघरी कॅलेंडर वाटप केले आहे . सुमारे २० हजार कॅलेंडर चे वाटप झाले आहे.
वारजे भागात प्रभाग ३० मधून देखील यापूर्वीच एका कार्यक्रमातून माजी नगरसेवकाने अशा पद्धतीने दुचाक्या , फ्रीज , वाशिंग मशीन वाटले असून लाडक्या बहिणीची आता सध्या तरी चंगळ सुरु आहे .त्याच बरोबर लहान मुलांसाठी देखील काही कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. भेळपुरी रगडा पुरी , स्वीट डिशेश खायला ठेऊन , खेळण्या आणून कौटुंबिक कार्यक्रमांची लय लुट सुरु आहे.
विशेष म्हणजे जी मंडळी निवडणूक लढविणार आहेत त्यांच्याकडून हि आतिषबाजी होत असल्याने आता नाताळच्या सुट्टीत तिला आणखी बहर येत आहे .उमेदवारी अर्ज दाखल करेपर्यंत त्यांच्या या खर्चाबाबत त्यांना कोणीही विचारणार नसल्याने बिनदिक्कत जाहिराती करत ते सुरु आहेत. उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर मात्र हे कार्यक्रम बंद होती. आणि झाले तर त्याची नोंद निवडणूक आयोग घेईल . तोवर होऊ देत खर्च .. आणि लोकही होऊ देत ऐश या पद्धतीने आनंद घेतआहेत.

