“डॅा. बाबा आढावांचा वारसा थांबणार नाही; सामाजिक चळवळीत आम्ही खंबीरपणे सोबत!”

Date:

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची आढाव कुटुंबियांसमोर ग्वाही; सांत्वन भेटीत व्यक्त केला निर्धार

पुणे, दि.१६ डिसेंबर २०२५:
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व कष्टकऱ्यांचे आधारस्तंभ बाबा आढाव यांचे निधन झाले असले, तरी त्यांचे विचार आणि कार्य अमर आहे. “बाबांनी आयुष्यभर जोपासलेली सामाजिक चळवळ यापुढेही अविरत सुरू राहावी, यासाठी आम्ही सर्वतोपरी कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू,” अशी ठाम ग्वाही विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली.

बाबा आढाव यांच्या निधनानंतर डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन मा.शिलाताई आढाव व अन्य कार्यकर्त्यांचे सांत्वन केले. या भेटीदरम्यान त्या भावूक झाल्या होत्या. केवळ दुःख व्यक्त न करता, बाबांचे सामाजिक कार्य आणि चळवळ पुढे नेण्यासाठी सहकार्य करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “बाबा आढाव हे केवळ एक व्यक्ती नव्हते, तर ती एक जिवंत संस्था होती. ‘एक गाव–एक पाणवठा’ आंदोलन असो वा हमाल-मापाडी कामगारांचा लढा, त्यांनी नेहमीच शोषित, वंचित आणि कष्टकऱ्यांचा आवाज बुलंद केला. आज बाबा आपल्यात नसले तरी त्यांनी जागवलेली प्रेरणा विझू देता कामा नये. शासन आणि समाज म्हणून या चळवळीला बळ देण्यासाठी आणि बाबांची अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत आहोत, हा विश्वास देण्यासाठी मी आज येथे आले आहे.”

यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी बाबांच्या आठवणींना उजाळा देत आढाव कुटुंबियांना धीर दिला. बाबांचा लढाऊ, निर्भीड आणि समाजाभिमुख वारसा जपणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

या प्रसंगी आढाव कुटुंबियांसह विविध सामाजिक चळवळींतील कार्यकर्ते व शिवसेना स्थानिक पदाधिकारी श्री.सुधीर कुरुमकर तसेच स्थानिक शिवसैनिक उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

धनकवडीतल्या प्राचार्याला पोक्सोची धमकी देऊन पोलिसांनीच ७ लाख लुटले-फौजदार आणि महिला मार्शलसह तिघांवर गुन्हा दाखल

पुणे : महाविद्यालयातील विद्यार्थीनीला धाक दाखवून अपहरण केल्याची तक्रार...

महाराष्ट्रात पहिल्यांदाच गुडघेदुखीवर शस्त्रक्रियामुक्त उपचारपद्धतीचा प्रारंभ

लो-डोस रेडिओथेरपीमुळे सांधेदुखीपासून त्वरित आराम मिळणार. रुग्णाच्या प्रकृतीत लवकर...

भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा मुंबईच्या पदाधिकारी व कार्यकरणीची यादी जाहीर

मुंबई, दिनांक ०९ एप्रिल २०२६ भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा,...

निवडणुकीतील ईव्हीएमची VVPAT ची तपासणी करा: मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

ईव्हीएमची (EVMs) तपासणी आणि छाननी करण्याचा आदेश ऐतिहासिक, १६...