पुणे- महापालिका निवडणुका जाहीर होताच आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फार महत्वाचे वक्तव्य केले आहे.अजितदादांच्या राष्ट्रवादी बरोबर मैत्रीपूर्ण लढत होईल असे सांगताना त्यांनी आम्ही एकत्र लढलो तर इतरांचा फायदा होऊ शकेल असे जाता जाता विधान केले आहे.ज्याकडे बारकाईने विरोधकांना पाहावे लागणार आहे. एकीकडे अजितदादा यांचा राष्ट्रवादी पक्ष स्वतंत्र लढणार आणि भाजपच्या विरोधातच लढणार का ? हाच प्रश्न काही ठिकाणी सतावणारा ठरला नाही तर नवल.मग अजितदादांचा पक्ष हा राष्ट्रवादी शरद पवार गटाशी आणि कॉंग्रेसशी लढताना दिसेल काय ?आणि त्या द्वारे भाजपला बळ देणारा ठरेल काय ?हेही पाहिले जाणार आहे. म्हणजेच अजितदादा जिंकण्यासाठी लढणार कि केवळ महाविकास आघाडीला धोबीपछाड करण्यासाठी लढणार ? असा प्रश्न आता कार्यकर्त्यांना सतावू शकेल असे अनेकांना वाटते आहे.अजीतदादांच्या पक्षाचे शहर अध्यक्ष माजी आमदार सुनील टिंगरे यांनी अजितदादांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे..अर्थात त्यांचे हे स्वागत राजकीय किती आणि कार्यकर्त्यांच्या हिताचे किती यावर पुढील राजकारण रंगणार आहे. आणि त्यांच्या उमेदवारांना निवडून येण्यासाठी भाजपची हक्काची मते निश्चित पडणार नाहीत मग कुठे कुठे लढावे लागेल आणि कोणाकोणाशी लढावे लागेल ? जिंकण्यासाठी किती आणि मविआला धोबीपछाड करण्यासाठी किती आणि कुठे कुठे भाजपला बळ देण्यासाठी लढावे लागेल या एकंदरीत राजकारणाचे चित्र येत्या राजकीय धामधुमीत निश्चितच दिसू शकणार आहे.
किंवा अजित पवार आणि शरद पवार या पुतण्या काकांचा पक्ष एकत्रित येऊन लढणे सध्या तरी शक्य दिसत नसल्याने महायुतीतून पुण्या पिंपरीत अजितदादा कशासाठी बाहेर ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान आज पुण्यात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी कदाचित असा शब्द देखील वापरला आहे त्यामुळे येत्या काही दिवसात याबाबतचे स्पष्ट चित्र जाणवणार आहे. तोवर कार्यकर्त्यांची उलघाल आणि धावपळ चालूच राहणार आहे.

