पुणे दि. 15 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे यांच्यामार्फत दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आलेला “प्लेसमेंट ड्राइव्ह” महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने रद्द करण्यात आला आहे.
सदर प्लेसमेंट ड्राइव्ह जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे, 289, रास्ता पेठ, सरदार मुदलीयार रोड, समर्थ पोलीस स्टेशन समोर, पुणे येथे आयोजित करण्यात येणार होता. मात्र आज दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता लागू झाल्यामुळे सदर कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे यांच्यामार्फत कळविण्यात आले आहे.

