पुणे (दि १४ ): शहर भाजप प्रमुख नेत्यांमधील मानले जाणारे माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन आज शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या हस्ते पार पडले. पुणे महापालिकेत सभागृह नेता म्हणून केलेल्या कार्यापासून ते प्रभाग क्रमांक २४ कसबा गणपती – कमला नेहरू हॉस्पिटल – केईएम हॉस्पिटल भागामध्ये त्यांनी आजवर केलेल्या कार्याचा आढावा या ‘विश्वास विकास निर्विवाद’ घोषवाक्य असणाऱ्या कार्य अहवालातून घेण्यात आला आहे.
सभागृह नेता म्हणून शहरासाठी घेण्यात आलेले दूरगामी परिणाम करणारे निर्णय. प्रभाग क्रमांक २४ — कसबा गणपती, कमला नेहरू हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल परिसर येथे गेल्या अनेक वर्षांत राबवलेल्या लोकाभिमुख उपक्रमांचा समग्र आढावा या कार्य अहवालातून मांडण्यात आला आहे. नागरी सुविधा, पायाभूत विकास, आरोग्यसेवा आणि जनतेशी थेट संवाद या सर्व बाबींचे ठळक प्रतिबिंब या अहवालात दिसून येते.
महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल येत्या दोन दिवसांत वाजण्याची शक्यता आहे. पुण्यामध्ये सत्ताधारी भाजपने उमेदवार निश्चितीसाठी जोरदार तयारी चालवली आहे. यामध्ये माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी असल्याने इच्छुकांच्या मुलाखती घेण्यापासून ते उमेदवारी ठेवण्यापर्यंत त्यांची महत्त्वाची भूमिका असणार आहे.

