मुंबई- राज्यातील २९ महापालिकेत प्रशासक राज आहे. मात्र, आता या ठिकाणी निवडणुका होण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे.प्रलंबित २९ महापालिकेच्या निवडणुका आता होणार असल्याची माहिती मिळते आहे. सोमवार संध्नंयाकाळ नंतर तर कधीही याची घोषणा होऊ शकते, असंही सांगण्यात येत आहे.त्याला कारणही तसेच आहे , आज रविवार असतानाही सभागृहात हिवाळी अधिवेशनाच अखेरचा दिवस सुरु आहे. आणि उद्या सोमवारी दुपारी दीड वाजता पुण्यात ३ हजार कोटीच्या कामाचे भूमिपूजन आणि लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,अजित पवार,उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ,विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत करण्यात येत आहे . तर मुख्यमंत्री सचिवालयातील प्रशासकीय माहितीनुसार, मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर त्याच दिवशी संध्याकाळी किंवा बुधवारी राज्य निवडणूक आयुक्त पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करू शकतात. राज्यातील २९ पैकी २८ महापालिकांच्या निवडणुकांसाठी मतदान १२ ते १५ जानेवारी दरम्यान घेण्याबाबत निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरू असल्याचे समजते.
राजकीय आणि प्रशसकीय वर्तुळातून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील सर्व महापालिकेच्या निवडणुका एकाच टप्प्यात घेण्याचा निवडणूक आयोगाचा विचार आहे. त्यानुसार पुढील दोन ते तीन दिवसांत आयोग यासंदर्भातील घोषणा करण्याची शक्यता आहे. १५ तारखेनंतर कधीही आचारसंहिता लागू होऊ शकते, असं सांगण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे १२ जानेवारीनंतर मतदान आणि दुसऱ्या दिवशी निकाल जाहीर होऊ शकतो, अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे.
दुसरीकडेकाही महापालिका अशा आहेत, जिथे ५० टक्क्यांची आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यात आली आहे. यात नागपूर आणि चंद्रपूर या मनपांचा समावेश आहे. त्यामुळे या ठिकाणी निवडणुका होतील की नाही, अशी शंका होती. मात्र, आता ठिकाणी देखील निवडणुका होतील, अशी सुत्रांची माहिती आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार या निवडणुकीचा निकाल न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहणार आहे. त्यामुळे याठिकाणी देखील निवडणूक होणार आहे.
आगामी निवडणुकीच्या दृष्टीने प्रशासनिक पातळीवरही हालचालींना वेग आला आहे. निवडणूक आयोगाकडून निवडणूक अधिकारी आणि सहायक अधिकाऱ्यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. काही अधिकाऱ्यांच्या बदल्या देखील करण्यात आल्या आहेत. राज्यात १५ डिसेंबरनंतर कधीही महापालिका निवडणुकीची घोषणा होऊ शकते. त्यामुळे राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे.

