Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

यंदाचा रविकिरण फिरता सुवर्णचषक कल्याण – वरपच्या ‘सेक्रेड हार्ट स्कुल’ शाळेकडे!

Date:

‘दिव्या खाली दौलत’ला द्वितीय तर ‘रंग जाणिवांचे’ तृतीय क्रमांकाने सन्मानित!

मुंबई : सहा दशकांहून अधिक काळ सामाजिक, शैक्षणिक, कला आणि क्रीडा क्षेत्रात अवीट ठसा उमटवत आलेल्या रविकिरण संस्थेची बहुप्रतीक्षित ३९ वी बालनाट्य स्पर्धा यंदा अधिक दिमाखात, अधिक उत्साहात आणि अधिक कलात्मकतेने साजरी झाली. ११ व १२ डिसेंबर २०२५ रोजी यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा येथे पार पडलेल्या या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट बालनाट्याच्या प्रथम पारितोषिकासह सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, उत्कृष्ट नेपथ्य, उत्कृष्ट प्रकाश योजना असे पाच पुरस्कार पटकावून कल्याण वरपच्या ‘सेक्रेड हार्ट स्कुल,चे ‘अडलंय ‘का’ हे बालनाट्य अव्वल ठरले. कल्पनाशक्तीने समृद्ध अशा १९ दर्जेदार बालनाट्यांमध्ये ही रंगतदार चुरस रंगली होती. यंदा रविकिरण मंडळाची ही स्पर्धा मंडळाचे ज्येष्ठ, निष्ठावान सभासद मनोहर नगरकर आणि कोकणच्या लालमातीतील रंगकर्मी रघुनाथ कदम यांच्या स्मृतीस समर्पित करण्यात आली होती. मंडळाचे जेष्ठ सभासद अशोक परब यांचा कलाक्षेत्रातील कार्याबद्दल आणि हेमंत चव्हाण यांचा सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

या स्पर्धेच्या निकालासाठी विशेष अतिथी म्हणून ‘सन मराठी वाहिनी’चे बिझनेस हेड दीपक राजाध्यक्ष आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरीताई पेडणेकर यांची विशेष उपस्थित होती. दोन्ही मान्यवरांचे ‘बालरंगभूमी’ व ‘रंगकलेशी’ जिव्हाळ्याचे अतूट नाते असल्याचे दिसून आले. मुलांनी दाखवलेले अभिनय कौशल्य, सादरीकरणातील पकड आणि लेखकांनी खास तयार केलेल्या संहितांतील अद्भुत कल्पनाशक्ती, काळानुसार विषयंतील विविधता यामुळे यंदाची स्पर्धा अविस्मरणीय ठरली. या स्पर्धेत आपले कलागुण दाखविणारे बालकलावंत उद्याचे चमकते तारे असणार आहेत हे निश्चित असे दीपक राजाध्यक्ष यांनी उद्गार काढले.

या स्पर्धेचे परीक्षण लोकप्रिय युवा अभिनेत्री पूर्वा पवार, ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक हेमंत सुहास भालेकर आणि ज्येष्ठ नाट्यसमीक्षक, निवेदक, कलादिग्दर्शक व पत्रकार नंदकुमार परशुराम पाटील यांनी केले. अभिनेते प्रमोद पवार, नारायण जाधव, महेंद्र पवार, विनोद पवार यांसह अनेक दिग्गज कलावंतांची उपस्थिती या स्पर्धेला लाभली.

सर्वोत्कृष्ट बालनाट्य, लेखन व दिग्दर्शनाच्या द्वितीय पुरस्कारासह सर्वोत्कृष्ट तृतीय अभिनेत्री या पुस्कारांवर ‘दिंडी ‘झ’ प्रतिष्ठान’च्या ‘दिव्या खाली दौलत’ने नाव कोरले तर सर्वात्कृष्ट अभिनय व लेखनाच्या प्रथम पुरस्कारासह सर्वोत्कृष्ट तृतीय बालनाट्य व दिग्दर्शनासह उत्तेजनार्थ अभिनेत्रीचा सन्मान ‘मुक्तछंद नाट्य संस्थेच्या ‘रंग जाणिवांचे’ला मिळाले. अनुप मोरे स्पोर्ट्स अँड सोशल फाऊंडेशन, पुणे यांच्या सर्कस या बालनाट्यास स्पेशल ज्युरी अवॉर्डने गौरवण्यात आले. तसेच पहिले उत्तेजनार्थ पारितोषिक पार्ले टिळक विद्यालय इंग्रजी माध्यम विलेपार्ले शाळेच्या ‘रे क्षणा’ ला, तर दुसरे उत्तेजनार्थ ‘संदेश विद्यालय, पार्क साईट’च्या ‘होता जिवा म्हणुन वाचला शिवा’ ला देण्यात आले. १९ उत्कृष्ट बालनाट्यांमधून हा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला.

श्री नागेश शशिकला नामदेव वांद्रे (अध्यक्ष, रवीकिरण मंडळ)
“रवीकिरण बालनाट्य स्पर्धेला गिरणगावच्या सांस्कृतिक इतिहासात अप्रतिम असे स्थान आहे. अनेक दिग्गज कलाकारांना त्यांच्या कलेचे पहिले व्यासपीठ याच स्पर्धेमधून लाभले, ही या उपक्रमाची सर्वात मोठी ताकद आहे. ३९ वर्षांपासून पारदर्शक निर्णयप्रक्रिया, सातत्यपूर्ण प्रोत्साहन आणि बालरंगभूमीप्रती असलेल्या अपार निष्ठेमुळे रवीकिरणने या क्षेत्रात भक्कम, उठावदार आणि विश्वासार्ह स्थान निर्माण केले आहे, याचा आम्हाला अभिमान वाटतो. यंदाही परीक्षक म्हणून लाभलेल्या मान्यवरांनी बालरंगभूमीची जाण, संस्कार आणि संवेदनशीलता जपत, गेल्या दोन दिवसांत अत्यंत सूक्ष्म, प्रामाणिक आणि न्याय्य मूल्यांकन केले आहे. गिरणगावाशी त्यांचे असलेले आपुलकीचे नाते आणि रवीकिरणच्या कार्यावरील त्यांचे प्रेम हीच आमच्या परंपरेची खरी संपत्ती आहे.”

श्री विजय पुष्पलता राजाराम टाकळे (माजी अध्यक्ष, रवीकिरण मंडळ)
“गेल्या ३९ वर्षांची ही अनुपम परंपरा, रविकिरण मंडळाच्या तीन पिढ्यांनी मनापासून जपली आहे. गिरणगावच्या सर्वांगीण विकासासाठी आमच्या पूर्वजांनी सामाजिक मूल्यांचा आणि संस्कारांचा जो दिवा आमच्या हातात दिला, तो पुढील पिढीकडे अखंड तेजाने पोहोचवण्याचे आमचे कर्तव्य आहे, आणि आनंदाची गोष्ट अशी की आमची नवी पिढीही प्रत्येक कसोटीवर उत्तमरीत्या खरी उतरते आहे. रवीकिरणची बालनाट्य स्पर्धा असो किंवा समाजाभिमुख उपक्रम—ही परंपरा आमची तरुण पिढी आगामी काळातही निष्ठेने, उत्साहाने आणि नवचैतन्याने पुढे नेत आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.”

संपूर्ण निकाल खालील प्रमाणे

मनोहर नगरकर आणि रंगकर्मी रघुनाथ कदम स्मृतिगत रविकिरण आयोजित ३९वी बालनाट्य स्पर्धा २०२५
निकालपत्र
उत्कृष्ट संगीत लाईव्ह): मधुरा / किमया कुबाडे / निष्ठी/ स्वरा / धवल मांडवकर
बालनाट्याचे नाव: रे क्षणा
शाळा संस्थेचे नाव: पार्ले टिळक, विलेपार्ले

उत्कृष्ट ध्वनी : अजिंक्य गोविलकर / आदर्श गायकवाड
बालनाट्याचे नाव : न्यानाचा प्रकाश
संस्थेचे नाव : लेक्सीकॉन ग्लोबल स्कूल

उत्कृष्ट प्रकाश योजना : हृषिकेश वायदांडे
नाट्याचे नाव : अडलंय “का”
शाळा संस्थेचे नाव : सेक्रेड हार्ट स्कुल, कल्याण

उत्कृष्ट नेपथ्य : प्रितीश खंडागळे, संदेश पडवळ
बालनाट्याचे नाव: शाळा/ संस्थेचे नाव : अडलंय “का”
शाळा संस्थेचे नाव : सेक्रेड हार्ट स्कुल, कल्याण

लेखन
लेखन तृतीय
लेखकाचे नाव : जयेश जोशी
बालनाट्याचे नाव : अवकाश
शाळा/ संस्थेचे नाव : अभिरंग बालकला संस्था, कल्याण

लेखन द्वितीय
लेखकाचे नाव : कृणाल रविंद्र दळवी
बालनाट्याचे नाव : दिव्या खाली दौलत
शाळा/ संस्थेचे नाव : दिंडी ‘झ प्रतिष्ठान

लेखन प्रथम
लेखकाचे नाव : संदिप प्रभु गचांडे
बालनाट्याचे नाव : रंग जाणिवांचे
शाळा/ संस्थेचे नाव : मुक्तछंद नाट्यसंस्था

दिग्दर्शन
दिग्दर्शन तृतीय
दिग्दर्शकाचे नाव : करिष्मा विलास वाघ
बालनाट्याचे नाव : रंग जाणिवांचे
शाळा/ संस्थेचे नाव : मुक्तछंद नाट्यसंस्था

दिग्दर्शन द्वितीय
दिग्दर्शकाचे नाव : कृणाल रविंद्र दळवी
बालनाट्याचे नाव : दिव्या खाली दौलत
शाळा/ संस्थेचे नाव : दिंडी ‘झ प्रतिष्ठान

दिग्दर्शन प्रथम
दिग्दर्शकाचे नाव : सुरेश. बा. शेलार
बालनाट्याचे नाव : अडलंय “का”
शाळा/ संस्थेचे नाव : सेक्रेड हार्ट स्कुल, कल्याण

अभिनय मुली

उत्तेजनार्थ
मुलीचे नाव : श्राव्या कुलकर्णी
भूमिकेच नाव : कनक
बालनाट्याचे नाव : नातं
शाळा/ संस्थेचे नाव: सुलु नाट्यसंस्था वाशी

उत्तेजनार्थ
मुलीचे नाव : स्वरा मेस्त्री
भूमिकेचे नाव : आई
बालनाट्याचे नाव: रंग जाणिवांचे
शाळा/ संस्थेचे नाव: मुक्तछंद नाट्यसंस्था

तृतीय
मुलीचे नाव : आश्री कदम
भूमिकेचे नाव : शिक्षिका
बालनाट्याचे नाव : रे क्षणा
शाळा/ संस्थेचे नाव : पार्ले टिळक विद्यालय, विलेपार्ले

द्वितीय
मुलीचे नाव : वल्हभी लोखंडे
भूमिकेचे नाव : आजी
बालनाट्याचे नाव : न्यानाचा प्रकाश
शाळा/ संस्थेचे नाव : लेक्सीकॉन ग्लोबल स्कूल

प्रथम
मुलीचे नाव : वंशीका विशाल घोगरे
भूमिकेचे नाव : अन्वेशा
बालनाट्याचे नाव : अडलंय “का”
शाळा/ संस्थेचे नाव : सेक्रेड हार्ट स्कुल, वरप- कल्याण

अभिनय मुले
उत्तेजनार्थ
मुलाचे नाव : डॅनियल ब्रम्हभट
भूमिकेच नाव : विक्रम साराभाई
बालनाट्याचे नाव : आकाशाच्या पलीकडे
शाळा/ संस्थेचे नाव : सेंट झेवियर्स इंग्लिश हायस्कूल, ठाणे

उत्तेजनार्थ
मुलाचे नाव : आरव भट
भूमिकेचे नाव : प्रकाश
बालनाट्याचे नाव : न्यानाचा प्रकाश
शाळा/ संस्थेचे नाव : लेकसीकॉन ग्लोबल स्कुल

तृतीय
मुलाचे नाव : दुर्व दळवी
भूमिकेचे नाव : ( दिनु / शाहीर)
बालनाट्याचे नाव : दिव्या खाली दौलत
शाळा/ संस्थेचे नाव: दिंडी ‘झ’ प्रतिष्ठान

द्वितीय
मुलाचे नाव : तन्मय चोरगे
भूमिकेचे नाव : जीवा
बालनाट्याचे नाव : होता जिवा म्हणुन वाचला शिवा
शाळा/ संस्थेचे नाव : संदेश विद्यालय -पार्क साईट

प्रथम
मुलाचे नाव : अमोघ टिपणीस
भूमिकेचे नाव : सोहम
बालनाट्याचे नाव : रंग जाणिवांचे
शाळा/ संस्थेचे नाव : मुक्तछंद नाट्यसंस्था

उत्तेजनार्थ बालनाट्य २०२५
नाट्याचे नाव : होता जिवा म्हणुन वाचला शिवा
शाळा/ संस्थेचे नाव: संदेश विद्यालय. पार्क साईट

उत्तेजनार्थ बालनाट्य २०२५
बालनाट्याचे नाव : रे क्षणा
शाळा/ संस्थेचे नाव : पार्ले टिळक विद्यालय इंग्रजी माध्यम विलेपार्ले

तृतीय बालनाट्य २०२५
बालनाट्याचे नाव : रंग जाणिवांचे
शाळा/ संस्थेचे नाव : मुक्तछंद नाट्यसंस्था

द्वितीय बालनाट्य २०२५
बालनाट्याचे नाव : दिव्या खाली दौलत
शाळा/ संस्थेचे नाव : दिंडी झ प्रतिष्ठान

सर्वोत्कृष्ट बालनाट्य २०२५
बालनाट्याचे नाव : अडलंय “का”
शाळा/ संस्थेचे नाव : सेक्रेड हार्ट स्कुल, वरप कल्याण

स्पेशल ज्युरी अवॉर्ड
बालनाट्य नाव – सर्कस
सादरकर्ते – अनुप मोरे स्पोर्ट्स अँड सोशल फाऊंडेशन, पुणे

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

एकनाथ शिंदे दोन महिन्यांत पुन्हा मुख्यमंत्री होणार:प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवली शक्यता

मुंबई-राज्यातील महायुतीमध्ये झालेल्या अंतर्गत कलहाच्या आणि नाराजीच्या नाट्यानंतर वंचित...

सायली संजीवच्या दमदार अभिनयासह ‘कैरी’चा यशस्वी प्रीमियर

भावना, थरार आणि निसर्गसौंदर्याचा संगम—‘कैरी’चा भव्य प्रीमियर बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट...

बनावट औषध निर्मिती:सदाशिवपेठेत छापा- अक्षय पुनिया,अमृत जैन,मनिष जैन,रोहित नावडकरसह देशभरातील ८ जणांवर गुन्हा दाखल

सिक्कीमच्या औषध कंपनीच्या नावाने बनावट औषधनिर्मिती:बिहारमधील मुदतबाह्य परवान्याचा गैरवापर,...

कम्युनिटी बॉयलरचे अग्रणी स्टीमहाऊस इंडियाने 425 कोटी रु. उभारण्यासाठी सेबीकडे UDRHP केला सादर

भारतामधील कम्युनिटी बॉयलर प्रणालीचे अग्रणी स्टीमहाऊस इंडिया लिमिटेडने त्यांचा अपडेटेड ड्राफ्ट...