मुंबई-
केंद्रीय दूरसंवाद तसेच ईशान्य क्षेत्र विकास मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंदिया 13 आणि 14 डिसेंबर रोजी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या दौऱ्यावर असणार आहेत. या दोन दिवसांच्या भेटीत टपाल विभागाच्या प्रमुख उपक्रमांचा आढावा ते घेणार आहेत. तसेच या दौ-यात ते स्थानिक समुदायांशी संवाद साधणार असून प्रमुख सांस्कृतिक आणि ऐतिहासिक स्थळांना भेट देतील. बेळगावी येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केंद्रिय मंत्री सिंदिया यांच्या हस्ते होणार आहे.
13 डिसेंबर 2025 रोजी केंद्रिय मंत्री सिंदिया बॉम्बे जिमखाना इथे टपाल तिकीटाच्या प्रकाशन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. या कार्यक्रमानंतर ते कोल्हापूरला रवाना होतील. कोल्हापूर इथे ते ग्रामीण डाक संमेलनात मार्गदर्शन करणार असून महाराष्ट्र विभागाच्या ग्रामीण डाक सेवकांशी संवाद साधणार आहेत. कोल्हापूरमधील ज्योतिबा आणि महालक्ष्मी मंदिरालाही ते भेट देणार आहेत.
या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी (14 डिसेंबर 2025) बेळगावी इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. स्थानिक रहिवाशांच्या दृष्टीने हा कार्यक्रम विशेष महत्त्वाचा असेल त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक या कार्यक्रमात सहभागी होतीलन, अशी अपेक्षा आहे.
***

