पुणे, – पुण्याच्या कोरेगाव पार्कमधील लक्झरी जीवनशैलीचे अग्रगण्य
ठिकाण असलेले कोपा, या भारतातील सर्वात मोठ्या ‘लक्झरी शॉपिंग फेस्टिव्हल’साठी मॉलमध्ये
जाणाऱ्यांना आणि लक्झरी प्रेमींना विशेष आमंत्रण देत आहे. या विशेष कार्यक्रमाद्वारे पुण्यात पदार्पण होते
आहे. हा शॉपिंग फेस्टिव्हल 28 जानेवारी 2024 पर्यंत सुरू असेल. लक्झरीचे अपवादात्मक क्षण निर्माण
करण्याच्या कोपाच्या वचनबद्धतेचे हे प्रदर्शन असेल.
द व्हाईट क्रो, वेस्ट एल्म, मायकेल कॉर्स, तुमी, बॉस, ब्रूक्स ब्रदर्स, ला मार्टिना, अरमानी एक्सचेंज, सनग्लासहट, आदिदास किड्स, स्टीव्ह मॅडन, सुपरड्री आणि रितू कुमार यांचा या फेस्टिव्हलमध्ये समावेश होणारआहे. खरेदीदारांना आनंद मिळवून देणे, अतुलनीय आणि विलासी किरकोळ अनुभव प्रदान करण्याच्या
कोपाच्या वचनबद्धतेला बळकटी देण्याच्या उद्देशाने प्रत्येक ब्रँड या उत्सवामध्ये योगदान देतो.
हा फेस्टिव्हल पुणेकरांसाठी खास आहे. यात सर्वोत्कृष्ट लक्झरी आणि प्रिमियम फॅशन आणि स्टाइल ब्रँड्सचीविचारपूर्वक निवडलेली श्रेणी प्रदर्शित केली जाते. अलीकडील ट्रेंडनुसार, भारतीयांमध्ये आलिशानजीवनशैलीमध्ये वाढ होत आहे. यामुळे पुण्यासारखी मेट्रो शहरे पाश्चिमात्य ब्रँड्ससाठी आकर्षक केंद्र बनतआहे. देशातील तरुण आणि संपन्न लोकसंख्येशी संलग्न राहण्याचे अनेक ब्रँड्सचे उद्दिष्ट आहे आणि यासारख्या
कार्यक्रमांमुळे या ट्रेंडचा फायदा घेण्याची एक उत्तम संधी आहे.
प्रदर्शनातील उत्कृष्ट कलेक्शन व्यतिरिक्त, हा महोत्सव CRED आणि IDFC क्रेडिट कार्डचा वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी रोमांचक जाहिराती आणि अतिरिक्त कॅशबॅक संधी सादर करतो.