नाताळ सण सर्वधर्मीयांसह सिटी चर्च येथे साजरा करण्याची परंपरा

Date:

नाताळ सण सर्वधर्मीयांसह सिटी चर्च येथे साजरा करण्याचा परंपरा कायम असून या चर्चने शैक्षणिक कार्य उभे करण्यात मोठा सहभाग नोंदविला असे येथेख्रिश्चन समाजाचे नेते लुकस केदारी यांनी सांगितले..

पुणे : सवाई माधवराव पेशव्यांनी१७९२ मध्ये सिटी चर्चसाठी जमीन दिली. हे शहरातील पहिले चर्च आहे. तेव्हा येथून शहराला सुरुवात होत असे. सिटी चर्चने या जागेत शाळा सुरू करून या भागात मोठे शैक्षणिक कार्य उभा केले आहे, अशी भावना पुष्करसिंह पेशवा यांनी सोमवारी व्यक्त केली.
नाना पेठ क्वार्टर गेट येथील सिटी चर्च या सर्वात जुन्या कॅथोलिक चर्चला सोमवारी २३३ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात पुष्करसिंह पेशवा, त्यांच्या मातु:श्री जयमंगलाराजे पेशवा आणि कन्या रियाराजे पेशवा यांचा अवर लेडी ऑफ इमॅक्युलेट कन्सेपशन चर्चचे प्रमुख धर्मगुरू फादर लुई हेरेडिया यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पेशव्यांचा चर्चतर्फे सत्कार करण्याच्या संकल्पनेबद्दल ज्येष्ठ पत्रकार प्रवीण प्र वाळिंबे यांचा सत्कार फादर गॉडवीन सालढाणा यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी फादर अल्फानसो, फादर भाऊसाहेब संसारे, रिजनल ख्रिश्चन सोसायटीचे अध्यक्ष
लुकस केदारी , सोसायटीचे संघटक पीटर डिसुझा , फ्लॉरिना वाझ, मिलिफा फर्नांडिस, जोएन डिसुझा उपस्थित होते.
पुष्करसिंह पेशवा म्हणाले, आज जाती आणि धर्मांकडे वेगळ्या नजरेने पाहिले जात आहे. सत्तेसाठी पूर्वी संघर्ष झाला. मात्र , एका पातळीनंतर संबंध जोपासले जात होते.
चिम्माजीअप्पांनी वसईच्या लढ्यात पोर्तुगीजांचा पराभव केला. मात्र, मराठ्यांनी तेथील पोर्तुगीजांचा धर्म बदलला नाही. आज तेथे मराठी आणि ख्रिश्चन लोक मिळूनमिसळून राहतात. हेच उदाहरण पुण्यात सिटी चर्चच्या बाबतीत दिसते. सवाई माधवराव पेशव्यांनी १७९२ मध्ये सिटी चर्चसाठी जमीन दिली. माझे वडील उदयसिंह पेशवा या चर्चच्या कार्याविषयी नेहमी माहिती सांगायचे. चर्चला २२५ वर्षे पूर्ण झाली. तेव्हाही आम्ही येथे आलो होतो. पेशव्यांची आठवण ठेवून तेव्हाही आम्हाला गौरविण्यात आले होते. थोरले बाजीराव पेशव्यांची माझी दहावी पिढी आहे. हे पहिले सिटी चर्च आहे असे वडील सांगायचे. येथून शहराला सुरुवात होत असे. सिटी चर्चने येथे शाळा सुरू करून मोठे शैक्षणिक कार्य उभा केले आहे. आमच्या तर्फे सर्वांना नाताळच्या शुभेच्छा.
प्रमुख धर्मगुरू फादर लुई हेरेडिया यांनी पेशवा कुटुंबीयांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी उपस्थित शेकडो ख्रिस्ती बांधवांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

शहरातले पहिले चर्च

सन १७८८ मध्ये शंभर पोर्तुगीज सैनिक आणि दोनशे कॅथोलिक सैनिक हे दारूगोळ्यासह पेशव्यांच्या सैन्यात दाखल झाले. पोर्तुगीजांचे अधिकारी नोमिन्हो हे माधवराव पेशवे (दुसरे) यांच्या संपर्कात होते. त्यांच्या विनंतीनुसार माधवराव पेशव्यांनी पाच एकर जागा पोर्तुगीजांना दान केली. त्यावरच पुण्यातील पहिले चर्च उभा राहिले. तेच आज सिटी चर्च म्हणून ओळखले जाते.


SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘अनिवासी भारतीयांच्या व भारतातील रीटेल क्षेत्रातील गुंतवणुकीबाबत ताज्या अर्थसंकल्पात ठोस उपाय हवे होते. ’

मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांची प्रतिक्रिया मुंबई, १ फेब्रुवारी २०२६...

हा अर्थसंकल्प नाही, तर जनतेची  थट्टा आहे-आशिष भोसले

एकीकडे तरुण बेरोजगार फिरत आहेत, उद्योगधंदे बंद पडत आहेत,...