Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

ताडीतील भेसळ ओळखण्यासाठी “सीएचटी-किट” विकसित

Date:

तंत्रज्ञानाचे हस्तांतरण ऑथेंटिक केमिकल्स अँड रिसर्च सेंटर, टेंभुर्णी यांना

पुणे:-सीएसआयआर- राष्ट्र्रीय रासायनिक प्रयोगशाळा (सीएसआयआर-एनसीएल), पुणे, यांनी ताडीत
आढळणाऱ्या क्लोरल हायड्रेट भेसळीचा त्वरित शोध घेण्यासाठी सोपे, जलद आणि वापरास सुलभ असे
क्लोरल हायड्रेट टेस्ट किट (सीएचटी-किट) विकसित केले आहे.
या तंत्रज्ञानाचे व्यापारीकरणासाठी ऑथेंटिक
केमिकल्स अँड रिसर्च सेंटर (ACRC-TEM), टेंभुर्णी यांना हस्तांतरण करण्यात आले आहे.
ताडी हे ताडाच्या झाडांपासून मिळणारे नैसर्गिक किण्वित पेय असून, ते राज्य शासन मान्यताप्राप्त
दुकानांमधून विक्रीस उपलब्ध असते. ताडीत सामान्यतः ५–६ टक्के इथाइल अल्कोहोल तसेच आरोग्यदायी
नैसर्गिक घटक असतात. महाराष्ट्र शासनाने ताडीच्या गुणवत्तेबाबत वाढलेल्या चिंतेची दखल घेऊन, उत्पादन
शुल्क अधिकारी, ताडी पुरवठादार, सीएसआयआर-एनसीएलचे वैज्ञानिक व तज्ज्ञ यांचा समावेश असलेली
समिती स्थापन केली होती. समितीच्या अहवालात ताडीत क्लोरल हायड्रेट या भारतात विक्रीस बंदी
असलेल्या रासायनिक पदार्थाची मोठ्या प्रमाणावर भेसळ होत असल्याचे निष्पन्न झाले. अनेक नमुन्यांमध्ये
या रासायनिक द्रव्याचे अत्यंत धोकादायक प्रमाण आढळले.
क्लोरल हायड्रेट शरीरात गेल्यावर ते ट्रायक्लोरोइथॅनॉल (एक प्रभावी मध्यवर्ती मज्जासंस्था दमनकारी)
आणि ट्रायक्लोरोअॅसिटिक आम्ल (क्षारक संयुग) मध्ये रूपांतरित होते. हे रसायन त्वचेवर पुरळ, उलट्या,
पोटाचे विकार, अल्सर, अवयवांचे नुकसान तसेच कोमामध्ये जाण्यापर्यंत गंभीर दुष्परिणाम करतात.
क्लोरल हायड्रेट, ट्रायक्लोरोइथॅनॉल आणि ट्रायक्लोरोअॅसिटिक आम्ल ही तिन्ही संयुगे संभाव्य
कर्करोगजनक म्हणून ओळखली जातात.

सध्याच्या चाचणी पद्धतींमध्ये उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना विविध उपकरणे बाळगावी लागतात अथवा
नमुने प्रयोगशाळेत पाठवावे लागतात, ज्यामुळे अडचणी निर्माण होतात आणि निकालास विलंब होतो. ही
समस्या सोडवण्यासाठी सीएसआयआर-एनसीएलच्या वैज्ञानिकांनी व्यापक प्रयोग करून फील्ड लेव्हलवर
त्वरित तपासणी करता येईल असे सीएचटी-किट विकसित केले आहे.
सीएचटी-किटमध्ये विशिष्ट प्रमाणात मिश्रित अभिक्रियेचे द्रावण असते. ताडीच्या नमुन्यात क्लोरल हायड्रेट
≥ 10 mg/L प्रमाणात उपस्थित असल्यास किट तत्काळ गुलाबी रंग दर्शवते. गुलाबी रंग न दिसल्यास नमुना
क्लोरल हायड्रेट भेसळीपासून मुक्त असल्याची खात्री मिळते. या किटची कार्यक्षमता महाराष्ट्र सरकारच्या
फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) ने प्रमाणित आणि मंजूर केली आहे.
सीएसआयआर-एनसीएलने हे किट महाराष्ट्र शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांना
सादर केले असून, उत्पादन व पुरवठ्यासाठीचे तंत्रज्ञान ACRC-TEM, टेंभुर्णी यांना अधिकृतरीत्या
हस्तांतरित केले आहे. ताडीतील घातक क्लोरल हायड्रेट भेसळीचा जलद व परिणामकारक शोध घेण्यासाठी
सीएसआयआर-एनसीएलचे सीएचटी-किट हे एक अद्वितीय, कार्यक्षम आणि लोकांच्या आरोग्य व सुरक्षेसाठी
महत्त्वपूर्ण साधन ठरेल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मुंढवा प्रकरणातील आरोपी तहसीलदाराने 85.50 लाखांची थकबाकी भरली रोख…

पुणे -मुंढवा भूखंड घोटाळ्यातील आरोपी असलेल्या निलंबित...

हडफडे नाईटक्लब आग प्रकरण: अधिकारी निलंबित, चौकशीला गती; मुख्यमंत्र्यांचे कडक कारवाईचे आदेश

गोवा पोलिसांचे पथक दिल्लीला रवाना, सर्व पर्यटन आस्थापनांचे सुरक्षा...

कंत्राटदारांच्या प्रश्नावर संसदेच्या अधिवेशनानंतर पुण्यात बैठक

शरद पवार यांचे सुनील माने यांना आश्वासननवी दिल्ली :...