जयपूर: येथे – 5 मजली (G+4) बांधकाम सुरू असलेले हॉटेल अवघ्या 3 सेकंदात जमीनदोस्त झाले. ते पाडण्यासाठी, सर्वप्रथम जेसीबीने इमारतीत जागोजागी ड्रिल करण्यात आले. त्यानंतर खांब पाडण्यात आले होते.शहरातील सर्वात पॉश भागांपैकी एक असलेल्या मालवीय नगरमध्ये बांधलेल्या या इमारतीला तडे गेले होते. हे हॉटेल बेकायदेशीर असल्याचा आरोप आहे.ही इमारत निवासी क्षेत्रात परवानगीशिवाय व्यावसायिक कामांसाठी नियमांविरुद्ध बांधली जात होती. याचे बांधकाम बऱ्याच अंशी पूर्ण झाले होते. बाथरूममध्ये फिटिंग आणि फरशांचे कामही पूर्ण झाले होते.
6 डिसेंबर रोजी तळघराजवळ खोदकाम करताना हॉटेलला तडे गेले होते. त्यानंतर हॉटेल एका बाजूला झुकले होते. इमारतीला आधार देण्यासाठी दोन क्रेन लावण्यात आल्या. अखेरीस 7 डिसेंबर रोजी इमारत पाडण्यात आली. संपूर्ण हॉटेल ढिगाऱ्यात बदलले.उप अंमलबजावणी अधिकारी इस्माईल खान म्हणाले – या बांधकामासाठी प्राधिकरणाकडून कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आली नव्हती.हॉटेल मालकांचे म्हणणे आहे की, आम्ही महानगरपालिकेकडून परवानगी घेतली आहे. यासाठी आम्ही महापालिकेत 1 लाख 25 हजार रुपये जमा केले होते. आता इमारतीला अवैध ठरवून पाडण्यात आले आहे.

