बाणेरमध्ये एकाला रिक्षाने उडवलं, उपचाराच्या बहाण्याने नेलं ,पण त्या वृद्धाला हॉस्पिटल मध्ये न नेता निर्जनस्थळी फेकलं, तब्बल 5 महिन्यांनी झाला उलगडा
पुणे : बाणेर रस्त्यावर ज्येष्ठ नागरिकाला धडक देऊन रेंज हिल्स परिसरात रेल्वे रुळाजवळ गवतात मरणासन्न अवस्थेत सोडून पळून गेलेल्या रिक्षा चालकाला पाच महिन्यांनंतर दिल्लीतून अटक करण्यात बाणेर पोलिसांना यश मिळाले. या अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या ज्येष्ठाचा वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला होता.
इसराइल मंगला गुर्जर, वय २२ वर्षे, रा. महिपालपुर रेडलाईट एरीया, महिपालपुर, दिल्ली गांव नौनेर पोस्ट, नगलिया भेवगजरौला, अमरोहा उत्तर प्रदेश असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. ‘दिल्ली न्यायालयाकडून ट्रान्झिट रिमांड घेऊन त्याला शनिवारी पुण्यात आणण्यात आले. त्यानंतर पुणे न्यायालयाने त्याला १२ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली,’ अशी माहिती बाणेर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी दिली.बाणेर-बालेवाडी फाटा येथील न्यू पूना बेकरीसमोर २० जुलै रोजी सायंकाळी रस्ता ओलांडणाऱ्या गोपाळ गोविंद वाघ (वय ६३, रा. बालेवाडी) यांना गुर्जर याने धडक दिली. यात वाघ यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. रुग्णालयात नेण्याची बतावणी करून गुर्जरने त्यांना रिक्षात बसविले. त्यानंतर त्यांना रेंज हिल्स परिसरातील रेल्वे रुळाजवळच्या गवतात त्यांना जखमी अवस्थेत सोडून पळ काढला होता. वेळेत उपचार न मिळाल्याने वाघ यांचा मृत्यू झाला होता.या प्रकरणी रिक्षा चालकाच्या विरोधात बाणेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असता, संबंधित रिक्षा सांगवी येथे सापडली. त्यानंतर रिक्षा मालकाकडे केलेल्या चौकशीत रिक्षा चालकाचे नाव व मोबाइल क्रमांक मिळाला. तोपर्यंत आरोपी गुर्जरने उत्तर प्रदेश गाठले. उत्तर प्रदेश आणि दिल्लीत त्याने सुतारकाम सुरू केलेनवीन फोन आणि सिमकार्ड घेतल्याने त्याचा ठावठिकाणा मिळत नव्हता. दरम्यान, गुर्जरने वडिलांना दुसऱ्या मोबाइल क्रमांकावरून संपर्क साधला. तांत्रिक तपासात तो दिल्लीत असल्याची माहिती बाणेर पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने दिल्लीतून गुर्जरला अटक केली.
इसराइल हा दिल्ली येथे ऐरोसीटी व महिपाल परिसरात कोठे तरी राहत असल्याची गुप्त माहिती बाणेर पोलीसांना मिळाली असता या माहितीवरुन पोलीस तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक डाबेराव, पोलीस अंमलदार शिंगे, गायकवाड, आहेर हे आरोपीचा शोध कामी दिल्ली येथे रवाना झाले. या पोलीस पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना नमुद आरोपीचा सतत ०७ दिवस दिल्ली येथे शोध घेवुन त्याला पकडले आणि अटक केली. त्याला दि.१०/१२/२०२५ रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड देण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती अलका सरग ह्या करीत आहेत.
संबधित कामगिरी, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त, परि.४ सोमय मुंडे, सहा. पोलीस आयुक्त, खडकी विभाग विठ्ठल दबडे यांचे मार्गदर्शनाखाली बाणेर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे)अलका सरग यांचे सुचनेप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक के.बी डाबेराव, सहा. पोलीस निरीक्षक रायकर, पोलीस अंमलदार गणेश गायकवाड, बाबा आहेर, किसन शिंगे, संदेश निकाळजे, अतुल इंगळे, प्रितम निकाळजे, शरद राऊत, गजानन अवातिरक, प्रदिप खरात, रोहीत पाथरुट व स्वप्नील मराठे यांनी केली आहे.

