विधानसभेत 75 हजार 286 कोटी रुपयांची पुरवणी मागणी, ७ विधेयके सादर

Date:

नागपूर – विधानसभेत 75 हजार 286 कोटी रुपयांची पुरवणी मागणी सादर करू त्यानंतर शोकप्रस्ताव संमत करत विधानसभा अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित केले .

शिवाजीराव भानुदास कर्डिले, विधानसभा सदस्य व माजी राज्यमंत्री, महादेवराव सुकाजी शिवणकर, भारत राजाभाऊ बोंद्रे, माजी विधानसभा सदस्य व माजी मंत्री श्याम ऊर्फ जनार्दन बाळकृष्ण आष्टेकर, माजी विधानसभा सदस्य व माजी राज्यमंत्री यशवंत बाबाजी दळवी, नारायण नानू पटेल, सिद्रामप्पा मलकप्पा पाटील, गिल्बर्ट जॉन मेंडोन्सा, राजीव अनिल देशमुख, माजी विधानसभा सदस्य निर्मला शंकरराव ठोकळ यांच्या दुःखद निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडण्यात आला. यानंतर सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले.

विधानसभेत मांडण्यात आलेले शासकीय विधेयक
(१) सन २०२५ चे विधानसभा विधेयक क्रमांक ८९ – महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) (सुधारणा) विधेयक, २०२५
(२) सन २०२५ चे विधानसभा विधेयक क्रमांक ९२ महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था (दुसरी सुधारणा) विधेयक, २०२५
(३) सन २०२५ चे विधानसभा विधेयक क्रमांक ९३ – महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) (सुधारणा) विधेयक, २०२५
(४) सन २०२५ चे विधानसभा विधेयक क्रमांक ९४ – महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत (सुधारणा) विधेयक, २०२५
(५) सन २०२५ चे विधानसभा विधेयक क्रमांक ९५ महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था (तिसरी सुधारणा) विधेयक, २०२५
(६) सन २०२५ चे विधानसभा विधेयक क्रमांक ९६ – महाराष्ट्र जन विश्वास (तरतुदींची सुधारणा) विधेयक, २०२५
(७) सन २०२५ चे विधानसभा विधेयक क्रमांक ९७ – महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (दुसरी सुधारणा) विधेयक, २०२५
नागपूरमधील अधिवेशन विदर्भासाठी असल्यामुळे विदर्भ करारानुसार व्हायला पाहिजे. आज काही पुरवणी मागण्या सादर होतील, पण इतरही पुरवणी मागण्या आणि बिले आहेत. सरकारला अधिवेशन लवकर संपवण्याची येवढी घाई का आहे? असा सवाल करत काँग्रेसचे नेते आणि आमदार नाना पटोले यांनी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी केली. मात्र, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ही मागणी फेटाळून लावली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भोसरी व पिंपरी विभागातील वीज पुरवठ्यावर परिणाम

महावितरणकडून वीज ग्राहकांना सहकार्याचे आवाहन पुणे, दि. २ फेब्रुवारी,२०२६ : महापारेषण...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ राजीनामा द्यावा:EpsteinFiles प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसचे निषेध आंदोलन

एपस्टीन फाईल्समधील खुलासे भारताच्या परराष्ट्र धोरण, राष्ट्रीय हित आणि...