पुणे-39व्या पुणे अंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये रविवार दि. 7 डिसेंबर रोजी सपन्न झालेल्या पूर्ण मेरेथॉन स्पर्धेत पुरुष गटात इथोपियाचा टेरेफे हैमानोत ( 2तास 20 मिनिटे 08 सेकंद) आणि पूर्ण मेरेथॉन महिला गटात भारताची साक्षी जडियाला ( 2 तास 39 मिनिटे 37 सेकंद ) यांनी प्रथम क्रमांक मिळवला. 42. 195 किमीच्या पूर्ण मेरेथॉन पुरुष गटात द्वितीय क्रमांक इथोपियच्या मिको देरेजे अलेनू (2तास 20 मिनिटे 09 सेकंद) आणि तृतीया क्रमांक भारताच्या त्रिथा पुन (2 तास 20 मिनटे 17 सेकंद) यांनी मिळवला.
पूर्ण मेरेथॉन महिला गटात द्वितीय क्रमांक इथोपियाच्या इडो टूलो (2तास 40 मिनटे 56 सेकेंद) आणि तृतीय क्रमांक इथोपियाची वारे डेमिसी (2तास 50 मिनटे 46 सेकेंद) यांनी मिळवला.

अर्ध मेरेथॉनमध्ये पुरुष गटात प्रथम क्रमांक भारताच्या सचिन यादव (1तास 3 मिनिटे 43 सेकेंद), द्वितीय क्रमांक भारताच्या राज तिवारी (1 तास 3 मिनिटे 44 सेकंद) आणि तृतीय क्रमांक भारताच्या मुकेश कुमार (1 तास 4 मिनटे 3 सेकंद) यांनी मिळवला
.मिहालांच्या अर्ध मेरेथॉनमध्ये भारताच्या भारती (1 तास 13 मिनटे 59 सेकंद), द्वितीय क्रमांक भारताची रविणा गायकवाड (1तास 15 मिनटे 58 सेकंद) आणि तृतीय क्रमांक भारताची तसेहय देसजन (1 तास 18 मिनटे 19 सेकंद) यांनी मिळवला.

पूर्ण मेरेथॉन पुरुष विजेता – टेरेफे हैमानोत (इथोपिया)
याशिवाय 10 किमी, 5 किमी आणि व्हीलचेअर स्पर्धाही उत्सहात पार पडली.
पहाटे 3 वाजता ऍड. अभय छाजेड यांच्या हस्ते फ्लेग ऑफ करून स्पर्धेचा प्रारंभ सणस मैदान जवळील हॉटेल कल्पना – विश्व चौकातून झाला. सर्व गटातील सर्व स्पर्धक परंतल्यानंतर सणस मैदान येथे बक्षीस वितरण समारंभ पार पडला. यावेळी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, पोलीस सहआयुक्त रंजनकुमार, अरविंद शिंदे, बाळासाहेब शिवरकर, विशाल चोरडिया, दीप्ती चवधरी, कमल व्यवहारे, आबा बागुल, प्रशांत जगताप, संजय मोरे, सुनील शिंदे, लता राजगुरू, डॉ. सतीश देसाई, संगीता तिवारी, डॉ. राजेंद्र जगताप, सचिन आडेकर, यासिन शेख, अक्षय जैन, रेस डायरेक्टर सुमंत वायकर, जॉईंट रेस डायरेक्टर रोहन मोरे व गुरुबंस कौर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

प्रारंभी पुणे अंतरराष्ट्रीय मेरेथॉनचे विश्वस्त ऍड. अभय छाजेड यांनी स्वागत केले. प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले कि, आपण आपल्या देशाला भारतमाता म्हणतो. मातृभूमीला माता म्हणणे ही आपली संस्कृती आहे. जात, धर्म, भाषा, प्रांत, यापेक्षाही खेळाडू म्हणून सगळे येथे एकत्र आले आहेत याचा आनंद आहे. हा उद्याचा भारत आहे. त्यासाठी बघ्याची भूमिका न घेता नागरिक म्हणून प्रत्येकाने पाऊल पुढे टाकावे. आजची मेरेथॉनची गर्दी त्यादृष्टीने खूप आश्वास्क आहे असे सांगून त्यांनी आयोजक अभय छाजेड व संयोजकांचे कौतुक केले.यास्पर्धेला पुणे महानगरपालिकेने 35 लाख रुपयांची बक्षिसे दिली. स्पर्धा पूर्ण करणाऱ्या सर्व गटातील सर्व खेळाडूंना फिनिशिंग मेडल देण्यात आले. 15 हजारहून अधिक धावपटू यात सहभागी झाले होते. कार्यक्रमच्या शेवटी रेस डायरेक्टर सुमंत वायकर यांनी आभार मानले.


