गोव्यातील अरपोरा परिसरात शनिवारी रात्री उशिरा एका नाईट क्लबमध्ये सिलींडर स्फोट झाल्याने 25 लोकांचा मृत्यू झाला. जखमींची संख्या अद्याप समोर आलेली नाही. पोलिसांच्या माहितीनुसार, आग रात्री १२ वाजण्याच्या सुमारास लागली.
घटनेची माहिती मिळताच गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि स्थानिक आमदार मायकल लोबो घटनास्थळी पोहोचले. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मृतांमध्ये तीन महिला आणि ३-४ पर्यटकांचा समावेश आहे.

ते म्हणाले की, तिघांचा मृत्यू भाजल्याने झाला असून, उर्वरित लोकांचा मृत्यू गुदमरल्याने झाला आहे. या अपघाताची सखोल चौकशी केली जाईल आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.सध्या मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नाईट क्लबने अग्निसुरक्षा नियमांचे पालन केले नव्हते. घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या अनेक गाड्यांनी क्लबला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवले आहे.घटनास्थळी प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत. आज सकाळी फॉरेन्सिक (FSL) पथक आग लागण्याचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास करेल.

