ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव आयसीयूमध्ये:शरद पवारांनी घेतली प्रकृतीची माहिती

Date:

पुणे-ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. बाबा आढाव यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना पुण्यातील पुना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. गेल्या दहा दिवसांपासून त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले असून त्यांच्या प्रकृतीत चढ-उतार होत आहेत. त्यामुळे त्यांच्या समर्थकांसह समाजात मोठी चिंता निर्माण झाली आहे.आढाव यांची तब्येत खालावल्याची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वतः रुग्णालयात पोहोचले. त्यांनी वैद्यकीय पथकाकडून संपूर्ण माहिती जाणून घेतली तसेच परिवाराशी देखील संवाद साधून धीर दिला. पवारांनी डॉक्टरांशी चर्चा करत उपचाराची प्रगती तपासली आणि गरज भासल्यास अधिक मदत करण्याचे आश्वासन दिले.

डॉक्टरांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हृदयाशी संबंधित समस्येमुळे त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अभिजित वैद्य आणि त्यांच्या टीमकडून आवश्यक उपचार चालू आहेत. नातेवाईकांनी सांगितले की, प्रकृती गंभीर असली तरी आत्ता ती स्थिर आहे. डॉक्टर सातत्याने लक्ष ठेवून आहेत. काही वेळापूर्वी अचानक प्रकृती खालावल्याने त्यांना अधिक काळजीपूर्वक निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

बाबा आढावांच्या कुटुंबीयांनी जनतेला एक महत्वाची विनंती केली आहे. त्यांनी सांगितले, कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नयेत. चुकीच्या माहितीमुळे गैरसमज निर्माण होतात. म्हणून केवळ कुटुंबीयांकडून किंवा अधिकृत सूत्रांकडून मिळणाऱ्या माहितीवरच विश्वास ठेवावा. तसेच बाबा आढाव यांच्या आरोग्याविषयी घडामोडी योग्य वेळी जनतेपर्यंत पोहोचवल्या जातील, असेही स्पष्ट केले आहे.

सामाजिक चळवळीतील एक महत्त्वपूर्ण नाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाबा आढाव यांच्या आरोग्याबाबत अनेक नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि कामगार संघटनांनीही चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहनही अनेकांनी केले आहे. महाराष्ट्रातील कामगार, शेतमजूर, कष्टकरी यांच्यासाठी आयुष्यभर कार्य केलेल्या या ज्येष्ठ समाजसेवकांचे स्वास्थ्य लवकर सुधारावे, अशी अपेक्षा सर्वांनी व्यक्त केली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

एमआयटी-एडीटी विद्यापीठाला ‘डास्का’ मानांकन

एआय व डेटा सायन्स अभ्यासक्रमांसाठी मिळाला आंतरराष्ट्रीय दर्जा; ठरले...

फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड: 45 वर्षांपासून विश्वासार्ह; पिढ्यां, पिढ्यांसाठी तयार केलेले

स्वर्गीय श्री. प्रल्हाद पी. छाब्रिया यांनी 1981 मध्ये स्थापन केलेल्या फिनोलेक्स...

भगवान महावीर स्वामीजी यांच्या २६२५व्या जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा

पुणे : ‘त्रिशला नंदन वीर की.... जय बोलो महावीर की, जय  बोलो...

७१ भारतीयांची घरातील लिव्हिंग रुमला सर्वाधिक पसंती

 इंटेरियो बाय गोदरेजच्या ‘मोमेंट्स दॅट मॅटर’ हा अहवाल प्रसिद्ध ~दिल्ली, लखनऊ, हैदराबाद, बंगळुरु, कोलकाता, गुवाहाटी, मुंबई आणि अहमदाबाद...