एसबीपीआयएम मध्ये ‘निर्भया जनजागृती’ सत्र संपन्न
पिंपरी, पुणे (दि. ०५ नोव्हेंबर २०२५) विद्यार्थिनींनी प्रवास करत असताना, सार्वजनिक ठिकाणी वावरत असताना स्वसंरक्षणाबाबत जागरूक राहिले पाहिजे. प्रत्येकीने आपल्या मोबाईल मध्ये सुरक्षिततेसाठी दामिनी पथकाचा नंबर सेव्ह करून ठेवावा. रिक्षा, टॅक्सी सारख्या सार्वजनिक वाहनातून प्रवास करण्याअगोदर ‘पॅनिक बटन’ कसे वापरावे हे समजून घ्यावे. वैयक्तिक सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्यास कायदेशीर हक्क वापरा असे आवाहन ॲड.अक्षता नेटके यांनी केले.
आहार आणि मानसिक स्वास्थ चांगले असल्यास करिअर वर लक्ष केंद्रित करता येते. आपला आहार उत्तम असेल तर रोग प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी उपयोग होतो, असे मार्गदर्शन डॉ. मिताली मोरे यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (एसबीपीआयएम) तर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, बोर्ड ऑफ स्टुडंट्स डेव्हलपमेंट विभागाच्या सहकार्याने ‘निर्भया जनजागृती’ सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एसबीपीआयएमच्या संचालिका डॉ. किर्ती धारवाडकर, डॉ. मिताली मोरे, समन्वयक डॉ. रूपाली कुदारे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. काजल महेश्वरी आदी उपस्थित होते.
या सत्रात ॲड.अक्षता नेटके यांनी वैयक्तिक सुरक्षितता आणि डॉ. मिताली मोरे यांनी मानसिक स्वास्थ्य या विषयावर मार्गदर्शन केले.
एसबीपीआयएमच्या संचालिका डॉ. किर्ती धारवाडकर यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, पीसीईटीच्या एसबीपीआयएम महाविद्यालयात विद्यार्थिनींमध्ये जागरूकता निर्माण व्हावी यासाठी अनेक उपक्रम राबविण्यात येतात.
स्वागत, प्रास्ताविक डॉ. किर्ती धारवाडकर, सूत्रसंचालन विद्यार्थिनी श्रावणी कनोरे आणि वर्षिणी गिरीश यांनी केले. आभार डॉ. काजल महेश्वरी यांनी मानले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले होते.

