पुणे, ५ डिसेंबर ः नांदे येथील ध्रुव ग्लोबल स्कूलच्या जलतरणपटूंनी विभागीय व जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत सोनेरी कामगिरी करत डंका पेटविला आहे. स्पर्धेत एकूण १० कांस्य पदके जिंकली. या यशाबद्दल ध्रव ग्लोबल स्कूलचे संचालक यशवर्धन मालपाणी व प्राचार्य संगीता राऊतजी यांनी सर्व खेळाडू तसेच प्रशिक्षकांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.
जिल्हा क्रीडा संचालनालया च्या वतीने अहिल्यानगर येथील वाडिया स्पोर्टस कॉम्प्लेक्समध्ये विभागीय व जिल्हास्तरीय स्पर्धां आयोजित करण्यात आल्या होत्या. ही स्पर्धा १४, १७ आणि १९ वर्षाखालील वयोगटात होती.
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी ध्रुव ग्लोबल स्कूलच्या जलतरणपटूंचा दबदबा राहिला. यात १४ वर्षाखाालील मुलींच्या गटात धाडसी खेळाडू अनया वानखेडे हिने ५० मी, १०० मी व २०० मी. बॅकस्ट्रोक शर्यतीत उत्कृष्ट कामगिरी करत कास्यपदक जिंकले. १७ वर्षाखालील गटात निया पतंगे हिने १०० मी. बॅकस्ट्रोक, २०० मी फ्रीस्टाईल व ५० मी. बॅकस्ट्रोक शर्यतीत कांस्यपदकची कमाई केली.
१४ वर्षाखाालील मुलींच्या गटात अनया वानखेडे हिने ५० मी, १०० मी व २०० मी. बॅकस्ट्रोक शर्यतीत कास्यपदक जिंकले तर १७ वर्षाखालील गटात निया पतंगे हिने १०० मी. बॅकस्ट्रोक, २०० मी फ्रीस्टाईल व ५० मी. बॅकस्ट्रोक शर्यतीत कांस्यपदकची कमाई केली.
तसेच मुलांच्या १४ वर्षाखालील गटात ध्रुव ग्लोबल स्कूल, नांदेच्या खेळाडूंनी ४ बाय १०० मीटर्स रिले शर्यतीत कास्यपदक जिंकले. यावेळी संघात अद्विक भालेकर, खुश मुंदडा, द्रोणा बेंदाळे व श्लोक चिलेकर यांचा समावेश होता. तसेच स्कूलच्या जलतरणपटूंनी विविध गटात उल्लेखनीय कामगिरी करत पदके पटकावली.
खेळाडूंच्या या कामगिरी मध्ये स्मिता काटवे, उमा जोशी, केशव हजारे आणि रुपाली अनाप यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शन मिळाले.
जलतरण स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूलचा डंका,एकूण १० कांस्य पदके जिंकली.
Date:

