पुणे: नवी दिल्ली, 3 डिसेंबर 2025
सरकारचे रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय मुख्यतः राष्ट्रीय महामार्गांच्या विकास आणि देखभालीशी संबंधित आहे. पुणे महानगर क्षेत्रातील विविध राष्ट्रीय महामार्गांवर वाहतुकीतील अडथळे दूर करण्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या महत्त्वाच्या उड्डाणपूल आणि रस्ते रुंदीकरण प्रकल्पांची माहिती तसेच ही कामे पूर्ण होण्यासाठीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे :
| S.No. | Name of work | Target date for completion |
| 1 | राष्ट्रीय महामार्ग-48 वरील चांदणी चौकातील एकत्रित संरचना बांधकाम | मार्च 2024 मध्ये पूर्ण झाले. |
| 2 | राष्ट्रीय महामार्ग -548DD वर कात्रज चौकात किलोमीटर 3/880 येथे सहा पदरी उड्डाणपूलाचे बांधकाम | जून 2026 पर्यंत पूर्ण होणार. |
| 3 | राष्ट्रीय महामार्ग -48 वरील पुणे-सातारा विभागातील सेवा/स्लिप रस्त्याचे काँक्रीटीकरण (41 किलोमीटर लांब) | जून 2027 पर्यंत पूर्ण होणार. |
| 4 | राष्ट्रीय महामार्ग -60 वरील नाशिक फाटा ते खेड़ विभागातील उंच मार्गिका ( 30 किलोमीटर लांब) | मार्च 2030 पर्यंत पूर्ण होणार. |
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) राष्ट्रीय महामार्ग -48 वर रावेत ते नर्हे दरम्यान उंच मार्गिका बांधण्याबाबतच्या शक्यता तपासण्यासाठी अभ्यास सुरू केला आहे.
याशिवाय, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळा सोबत (एमएसआयडीसी) सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारानुसार पुणे–शिरूर विभाग (राष्ट्रीय महामार्ग -753F), तळेगाव–चाकण–शिकरपूर विभाग (राष्ट्रीय महामार्ग -548D) आणि हडपसर–यवत विभाग ( राष्ट्रीय महामार्ग-65) येथे तांत्रिक शक्यतेनुसार उंच मार्गिका बांधकाम / क्षमता वाढविण्याचे काम होणार आहे.
प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आणि सुरू असलेली विकासकामे लवकर पूर्ण करण्यासाठी एनएचएआय, पुणे महानगरपालिका पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि राज्य व केंद्र सरकारच्या इतर संस्था यांच्यात नियमित बैठक घेतल्या जात आहेत.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

