पुणे, दिनांक 4 डिसेंबर 2025 :प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, पुणे यांच्यामार्फत नागरिकांच्या पासपोर्ट संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी ओपन हाऊस अर्थात संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
संवाद सत्रादरम्यान, प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, पुणे अंतर्गत येणाऱ्या पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर, जालना, परभणी, नांदेड, बीड, उस्मानाबाद आणि लातूर या जिल्ह्यांतील पासपोर्ट अर्जदार त्यांच्या पासपोर्ट अर्ज/तक्रारीशी संबंधित प्रश्नांसाठी प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना भेटू शकतात.
हे संवाद सत्र येत्या बुधवारी 10 डिसेंबर 2025 रोजी पुण्यातील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, पासपोर्ट बिल्डींग, सर्व्हे नंबर 5/2/2 बाणेर–पाषाण लिंक रोड, बाणेर, पुणे येथे दुपारी 3 ते 5 या वेळेत आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाने दिली आहे.
त्यासाठी अर्जदारांनी खालील तपशीलांचा उल्लेख करून rpo.pune@mea.gov.in वर मेल करून आपल्या प्रश्नांची नोंद करावी.
| फाइल क्रमांक | |
| नवीनतम पासपोर्ट क्रमांक (जर असेल तर) | |
| नाव | |
| प्रश्न थोडक्यात |
यानंतर प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, पुणे यांच्यामार्फत आपणास एक पुष्टीकरण ईमेल पाठवला जाईल. हा पुष्टीकरण ईमेल सादर केल्यानंतरच संवाद सत्रात प्रवेश दिला जाईल, याची नोंद घ्यावी.

