पुणे : पुणेकरांच्या मनोरंजनाला नवी झिंग देण्यासाठी कोपा मॉलमध्ये यंदाच्या आठवड्याअखेर दोन खास कार्यक्रमांची मेजवानी सजली आहे; ५ आणि ६ डिसेंबर रोजी सलग दोन संध्याकाळी संगीत व विनोदाचा अनोखा संगम अनुभवायला मिळणार आहे.
५ डिसेंबर रोजी भारतीय फ्युजन रॉक संगीताला नवा आयाम देणाऱ्या प्रतिष्ठित ‘Indian Ocean’ बँडचा बहारील ओपन–एअर लाईव्ह परफॉर्मन्स टेरेसवर होणार आहे. पुणेकरांना भावपूर्ण सुरावटी आणि बँडची खास ध्वनीशैली यांचे मनमोहक मिश्रण एका वेगळ्या वातावरणात ऐकण्याची संधी मिळणार आहे.
यानंतर, दुसऱ्या दिवशी ६ डिसेंबर रोजी कॉमेडी फेस्ट अंतर्गत लोकप्रिय स्टँड–अप कॉमेडियन – विपुल गोयल, प्रेक्षकांसाठी आपली खास निरीक्षणाधारित विनोदी शैली आणि टोकदार हजरजबाबीपणा घेऊन येणार आहेत. आजच्या शहरी जीवनशैलीशी जुळणारी, सहजसुंदर कथा आणि विनोद यांचे अनोखे सादरीकरण पुणेकरांना भरभरून हसवणार आहे. या दोन्ही कार्यक्रमांसाठी नाममात्र शुल्क ठेवण्यात आले असून, अधिकाधिक पुणेकरांनी सहभागी व्हावे, यासाठी आयोजकांकडून आवाहन करण्यात आले आहे.
कोपा मॉलचे हे सलग दोन संध्याकाळीचे कार्यक्रमं पुणेकरांना संगीत आणि हास्याचा दुहेरी आनंद देणारे ठरतील. शहराच्या बदलत्या सांस्कृतिक धाटणीला अनुसरून, समुदायाला अधिक समृद्ध सामाजिक आणि सांस्कृतिक अनुभव देणे, हे मॉलचे उद्दिष्ट आहे. डिसेंबरच्या उत्सवी दिवसांत या मनोरंजनमय कार्यक्रमांमुळे पुण्याचे सांस्कृतिक कॅलेंडर अधिक रंगतदार होणार आहे!
कार्यक्रम:
1. Indian Ocean Live – ५ डिसेंबर २०२५ (सायं. ७ वाजता!)
2. Comedy Fest with Vipul Goyal – ६ डिसेंबर २०२५ (सायं. ६.४५ वाजता!)

