श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्यावतीने १२८ वा दत्तजयंती उत्सव ; भक्तीगीतांचा कार्यक्रम
पुणे : बुधवार पेठेतील श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिराच्या १२८ व्या दत्तजयंती उत्सवानिमित्त मंदिरासमोर श्री दत्त कलामंच येथे आयोजित कार्यक्रमात ट्रस्टच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन स्वामी मकरंदनाथ यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी युवा गायक विराज कदम, सावनी सोमवंशी, क्षितिजा साळुंखे व गिरीजा साळुंके यांच्या भक्तिसंगीत कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्राचार्य उदय शेठ, सीए अमोल दातार, ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. शिवराज कदम जहागिरदार, कार्यकारी विश्वस्त अॅड.रजनी उकरंडे, कोषाध्यक्ष युवराज गाडवे, उप उत्सव प्रमुख अक्षय हलवाई, विश्वस्त अॅड. प्रताप परदेशी, डॉ. पराग काळकर, राजेंद्र बलकवडे आदी उपस्थित होते.
स्वामी मकरंदनाथ महाराज म्हणाले, दिनदर्शिकेचे प्रकाशन अनेकजण करतात, परंतु या ट्रस्टच्या दिनदर्शिकेचे विशेष महत्व याकरिता या मध्ये प्रत्येक हिंदू सण आणि वाराचे महत्व सांगितले आहे. त्याचा उपयोग प्रत्येकाला नक्कीच होईल. यावेळी त्यांनी कार्यक्रमात गायन करणाऱ्या युवा कलाकारांचे विशेष कौतुक देखील केले.
स्वामी कृपा कधी करणार… निघालो घेवून दत्ताची पालखी अशा भक्तीगीतांनी दत्त मंदिराचा परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. संगीताच्या सुरावटींसोबतच भाविकांच्या टाळ्यांचा आणि “जय गुरुदत्त” घोषाने वातावरण भक्तीमय झाले. तर युवा कलाकारांनी सादर केलेल्या सुरेल भक्तिगीतांनी उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले.

