मुंबई-
आयोगाच्या रडारवर असलेल्या नेत्यांनी भरसभेत मतदारांना आकर्षित करण्यासाठी किंवा धमकावण्यासाठी विविध विधाने केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी “तुमच्या हातात मत आहे, तर माझ्या हातात निधी आहे. राष्ट्रवादीला मतदान न केल्यास निधीला कात्री लावणार,” अशा आशयाचे विधान केले होते. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अप्रत्यक्षपणे ‘तिजोरीच्या चाव्या’ संदर्भातील वक्तव्य केले होते. मंत्री गुलाबराव पाटील यांनी मतदानाच्या आदल्या रात्री ‘लक्ष्मी दर्शन’ होणार असल्याचे विधान केले होते. तर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी “खा कुणाचंही मटण, पण दाबा कमळाचं बटण,” असे विधान केले होते.
मंगळवारी (उद्या) राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतदान होत असून, बुधवारी मतमोजणी पार पडणार आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने सर्वच पक्षांनी ताकद पणाला लावली . मात्र, शेवटच्या टप्प्यात ही राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. निवडणूक आयोगाने , आचारसंहितेचा भंग होईल अशी वक्तव्ये करणाऱ्या 20 नेत्यांची यादी तयार करण्यात आली आहे.आयोगाने ज्या ठिकाणी ही वक्तव्ये झाली, त्या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांना व्हिडिओ रेकॉर्डिंग तपासून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

