मुंबई: माइंडस्पेस बिझनेस पार्क्स REIT (BSE: 543217 | NSE: MINDSPACE) (‘माइंडस्पेस REIT’) — भारतातील 4 प्रमुख कार्यालयीन बाजारपेठांमध्ये स्थित उच्च गुणवत्तेच्या ग्रेड A ऑफिस पोर्टफोलिओचा मालक — यांनी आज K रहेजा कॉर्पकडून सुमारे ₹2,916 कोटी किंमतीची तीन प्रीमियम सीबीडी (सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट) मालमत्ता अधिग्रहित करण्याची घोषणा केली. माइंडस्पेस बिझनेस पार्क्स REIT च्या मॅनेजरच्या संचालक मंडळाने ही खरेदी तसेच ₹1,820 कोटीपर्यंतच्या प्रेफरेंशियल युनिट इश्यूला, युनिटहोल्डर्सची आणि आवश्यक नियामक मंजुरींच्या अधीन राहून, मंजुरी दिली आहे.
REIT नेखालीलअधिग्रहणांचीघोषणाकेलीआहे:
१) प्रमाणप्रॉपर्टीजप्रायव्हेटलिमिटेड (“प्रमाण”) ही कंपनी मुंबईतीलवर्ली या अत्यंत प्रतिष्ठित मायक्रो-मार्केटमधील अॅसेंट – वरली या नव्याने पूर्ण झालेल्या प्रीमियम कमर्शियल टॉवरमध्ये सुमारे 0.45 मिलियनचौ. फूट क्षेत्रफळाची मालमत्ता मालकीची आहे. याशिवाय, पुणेच्याकल्याणीनगर या वाढत्या मायक्रो-मार्केटमध्ये सुमारे 0.1 मिलियनचौ. फूट क्षेत्रफळाची एक ऑफिस इमारतही प्रमाणच्या मालकीची आहे.
२) सनड्यूरिअलइस्टेटप्रायव्हेटलिमिटेड (Sundew Real Estate Private Limited – “सनड्यू RE”) ही कंपनी दी स्क्वेअर अव्हेन्यू 98 (बीकेसीअॅनेक्स) येथे सुमारे 0.2 मिलियनचौ. फूट प्रीमियम ऑफिस स्पेसची मालकी राखते. ही मालमत्ता मुंबईच्यावित्तीयकेंद्रात — बीकेसीआणिबीकेसीअॅनेक्स — अत्यंत धोरणात्मक ठिकाणी असलेली ग्रेड ए ऑफिस इमारत आहे.
या अधिग्रहणांमुळे मिळणारे एकूण सुमारे 0.8 मिलियन चौ. फूट प्रीमियम लीज़ेबल क्षेत्रफळ स्वतंत्र मूल्यांकनकर्त्यांनी सुमारे ₹3,106 कोटी इतके सकल मालमत्ता मूल्य (Gross Asset Value – GAV) ठरवले आहे. अधिग्रहणाची अंतिम किंमत सुमारे ₹2,916 कोटी असेल, जी दोन्ही स्वतंत्र मूल्यांकनांच्या सरासरीपेक्षा सुमारे 6.1% कमी (डिस्काउंट) आहे. हे अधिग्रहण पूर्ण झाल्यानंतर, माइंडस्पेस REIT चे एकूण पोर्टफोलिओ सुमारे 39 मिलियन चौ. फूट इतके होईल आणि भारतातील सर्वात प्रभावशाली व्यावसायिक कॉरिडॉरमध्ये त्याची उपस्थिती आणखी मजबूत होईल.
| प्रोफॉर्माआधारावरयाअधिग्रहणातूनखालीललाभअपेक्षितआहेत:● NOI मध्येसुमारे 9% वाढ● DPU मध्येसुमारे 1.7% वाढ (accretion) ● Front-office पोर्टफोलिओव्हॅल्यूचाहिस्सावाढूनसुमारे 7.9% पर्यंतजाणे● मार्कीटेनंट्समुळेसततआणिस्थिरउत्पन्नाचीखात्री | |
माइंडस्पेस REIT च्या या प्रीमियम प्रॉपर्टीज त्याच्या मुख्य ऑफिस पोर्टफोलिओला अधिक सक्षम बनवतात, तसेच महत्त्वाच्या बिझनेस डिस्ट्रिक्टमध्ये त्यांची उपस्थिती वाढवतात. या अधिग्रहणामुळे कंपनीची दीर्घकालीन रणनीती — म्हणजेच भारतातील सर्वात गतिमान शहरी बाजारांमध्ये स्थिर, उत्पन्न देणाऱ्या मालमत्तांचे मजबूत पोर्टफोलिओ तयार करणे — आणखी वेग घेते. या ग्रेड ए+ प्रॉपर्टीजमध्ये मार्क टू मार्केटची चांगली संधी असून, मजबूत रेंटल वाढ आणि व्हॅल्यू-ऍड करण्याची क्षमता स्पष्ट दिसते. या व्यवहारानंतर माइंटस्पेस REIT चा ग्रॉस अॅसेट व्हॅल्यू (GAV) अंदाजे 41,020 कोटी रुपयां वरून वाढून सुमारे 44,126 कोटी रुपये होणार आहे.
अधिग्रहणाबद्दलबोलतानामाइंडस्पेस REIT चेएमडीआणिसीईओश्री. रमेशनायरम्हणाले, “या प्रीमियम मालमत्ता माइंडस्पेस REIT च्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट करणे म्हणजे मुंबईतील सर्वाधिक मागणी असलेल्या सीबीडी ऑफिस डिस्ट्रिक्टमध्ये आमची उपस्थिती आणखी मजबूत करण्याचा धोरणात्मक निर्णय आहे. या उच्च-गुणवत्तेच्या, संस्थात्मक मालमत्ता आहेत, ज्यांना मजबूत कॅशफ्लो आहे आणि वॉल स्ट्रीटमधील काही मोठे अँकर टेनंट्स येथे आहेत. या व्यवहारामुळे आमच्या पोर्टफोलिओचा आकार, स्थिरता आणि दीर्घकालीन वाढ अधिक बळकट होते. आमच्यासाठी सूत्र सोपे आहे — उत्तम ठिकाणी गुंतवणूक करा, उत्कृष्ट टेनंट्ससोबत काम करा आणि आमच्या युनिटहोल्डर्ससाठी टिकाऊ मूल्य निर्माण करा. हे अधिग्रहण आमच्या ‘लव्ह्ड वर्कस्पेस, मॅक्सिमायझिंग व्हॅल्यू’ या दृष्टीकोनाशी पूर्णपणे सुसंगत आहे आणि भारताच्या ऑफिस रिअल इस्टेट क्षेत्रातील माइंडस्पेस REIT ची नेतृत्वस्थानी भूमिका आणखी मजबूत करते.”
ट्रान्झॅक्शनहायलाइट्स :
अॅसेट्सवरएकनजर :
● एकूण लीझेबल क्षेत्रफळ अंदाजे 0.8 msf.
● स्वतंत्र मूल्यांकनानुसार एकूण ग्रॉस व्हॅल्यू अॅसेट (GAV) सुमारे 3,106 कोटी रुपये.
● मालमत्तांमध्ये वॉल स्ट्रीटवरील सर्वात मोठ्या दोन कंपन्यांसह अनेक मार्क्यू टेनंट्स.
● निश्चित व्यापलेली जागा : अॅसेंट-वरळी : अंदाजे 86% (इमारत वर्ष 2025 मध्ये पूर्ण), दी स्क्वेअर अव्हेन्यू 98 (बीकेसी अॅनेक्स): 100%, ऑफिस बिल्डिंग (पुणे): 100%
पोर्टफोलिओएन्हान्समेंट
● मुंबईतील प्रमुख फ्रंट-ऑफिस सी.बी.डी. बाजारपेठांमध्ये माइंडस्पेस REIT.ची उपस्थिती अधिक मजबूत होते.
● सुमारे 7 वर्षांचा डब्ल्यू.ए.एल.ई. (WALE), ज्यामुळे स्थिर उत्पन्नासोबत वाढीचीही शक्यता निर्माण होते.
● द स्क्वेअर अव्हेन्यू 98 (बी.के.सी. अॅनेक्स) मध्ये मार्क-टू-मार्केट क्षमतेमुळे आणि एरिया एन्हान्समेंटच्या संधीमुळे मूल्यवर्धन शक्य आहे.
फायनान्शियलहायलाइट्स
● सुमारे ₹2,916 कोटी (एंटरप्राइज व्हॅल्यू) इतक्या किंमतीत अधिग्रहण; दोन स्वतंत्र व्हॅल्युएशन्सच्या सरासरीपेक्षा अंदाजे 6.1% डिस्काऊंट.
● खरेदी मूल्य सुमारे ₹1,820 कोटी (१००% इक्विटीसाठी).
● वित्त वर्ष 26 साठी एन.ओ.आय.मध्ये सुमारे ₹226 कोटींची वाढ (प्रो-फॉर्मा आधारावर); म्हणजेच अंदाजे 9% वाढ.
पोस्ट–अधिग्रहणपोर्टफोलिओमेट्रिक्स
● पोर्टफोलिओ आकार सुमारे 38.2 एम.एस.एफ. (msf) वरून सुमारे 39 एम.एस.एफ. पर्यंत वाढणार.
● ग्रॉस अॅसेट व्हॅल्यू (GAV) सुमारे ₹41,020 कोटींवरून सुमारे ₹44,126 कोटीं पर्यंत वाढणार.
● लोन-टू-व्हॅल्यू रेशो (LTV) 24.2% वरून किंचित वाढून 24.7% होणार; वाढीसाठी पुरेशी क्षमता उपलब्ध.
वर्षानुवर्षे, माइंडस्पेस REIT (Mindspace REIT) ने धोरणात्मक अधिग्रहणांद्वारे आपला पोर्टफोलिओ सातत्याने वाढवला आहे. यामध्ये पहिले स्पॉन्सर अधिग्रहण म्हणून सुमारे 1.82 एम.एस.एफ. (msf) क्षेत्रफळाचा कॉमर्जोन रायडुर्ग प्रकल्प; माइंडस्पेस माधापूर येथे थर्ड-पार्टी युनिट्सची पुनर्खरेदी; चेन्नईतील कॉमर्जोन पोरूर येथे पूर्ण मालकीसाठी केलेले एकत्रीकरण; पुण्यातील कॉमर्जोन येरवडा येथे निवडक विस्तार; तसेच आपल्या पोर्टफोलिओ पार्क्सच्या बाहेर केलेले पहिले थर्ड-पार्टी अधिग्रहण — सुमारे 0.81 एम.एस.एफ. क्षेत्रफळाचा ‘द स्क्वेअर, 110 फायनान्शियल डिस्ट्रिक्ट’ (पूर्वीचे Q-City) ह्यांचा विशेष समावेश आहे. सद्यचा व्यवहार हा माइंडस्पेस REIT. चा दुसरा स्पॉन्सर अधिग्रहण व्यवहार ठरतो, ज्यामुळे त्यांची शिस्तबद्ध, मूल्यवर्धक वाढ धोरण अधिक दृढ होते आणि युनिटहोल्डर्सना सातत्याने मूल्य देण्याची त्यांची वचनबद्धताही अधोरेखित होते. ही व्यवहार-शृंखला आतापर्यंत झालेल्या अंदाजे 3.2 एम.एस.एफ. अधिग्रहणांवर आधारित असून, माइंडस्पेस REIT.च्या सातत्यपूर्ण आणि शिस्तबद्ध वाढ प्रवासातील आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरते.

