पुणे – ध्रुव ग्लोबल स्कूल, नांदेच्या वॉटर पोलो खेळाडूंनी विभागीय व जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये अप्रतिम कामगिरी करून शाळेची शान उंचावली आहे.
या खेळाडूंनी जिल्हास्तरीय वॉटर पोलो स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. त्यानंतर विभागीय स्तरावरील उत्कृष्ट खेळ करीत कांस्यपदक मिळवत पुन्हा एकदा आपली कामगिरी सिद्ध केली. या संघामध्ये द्रोणा बेंदळे, श्लोक चिलेकर, श्रीहरी सचिन निकम, पार्थ पोटे, अद्विक प्रसाद भालेकर, आयुष शैलेश नाशी, खुष मुंदडा, सोहम बारी, सुमेध गौरिश पानसे, यश रेवतकर, इशान मंत्री आणि शर्विल जंगम या खेळाडूंचा समावेश होता. सर्व खेळाडूंनी उत्कृष्ट संघभावना, सहनशक्ती आणि खेळाडूवृत्ती दाखवीत हे यश संपादन केले. या संघाला प्रशिक्षक श्री. कपिलेश हरणे आणि श्री. अनिकेत सरदार यांचे मार्गदर्शन लाभले..
या यशाबद्दल ध्रुव ग्लोबल स्कूलचे संचालक यशवर्धन मालपाणी व प्राचार्य संगीता राऊतजी यांनी सर्व खेळाडू तसेच प्रशिक्षकांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.

