३० नोव्हेंबर ‘स्वच्छ आमुची नदी’ ‘नदी महोत्सव २०२५ मध्ये सहभागी व्हा – महापालिकेचे आवाहन

Date:


पुणे- येथील महापालिकेतील घनकचरा व पर्यावरण विभाग यांच्या वतीने ‘नदी महोत्सव २०२५- स्वच्छ नदी, सुंदर पुणे’ अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा हा “RIVER WEEK” तसेच २ डिसेंबर हा “राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस” म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. या अनुषंगाने पुणे शहरातील मुठा नदीपात्रातील स्वच्छता करणेसाठी “नदी महोत्सव- स्वच्छ नदी, सुंदर पुणे” आयोजित केला आहे.
हा नदी महोत्सव पुणे महानगरपालिका, युवा फॉर अॅक्शन, इकोसन सर्व्हिसेस फाउंडेशन आणि जीवितनदी – लिव्हिंग रिव्हर फाउंडेशन व इतर स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने रविवार दि. ३० नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ७.०० ते १०.०० भिडे पूलापासून ते म्हात्रे पूल पर्यंत स्वच्छता मोहीमद्वारे साजरा करण्यात येणार आहे.
या महोत्सवात नदी स्वच्छता मोहिम, पथनाट्य, ड्रम-सर्कल्स यांसारखे जनजागृती कार्यक्रम, पर्यावरण विषयक जनजागृती स्टॉल्स असणार आहेत. पर्यावरणीय बांधिलकीला बळकटी देण्यासाठी यामध्ये नागरिक, विद्यार्थी व स्वयंसेवक यांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर असणे आवश्यक आहे.
या कार्यक्रमास पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम, पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र हुडी, आणि पुणे शहराचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार इ. मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवण्यासाठी नोंदणी लिंक: https://forms.gle/vu4Ch33pn3Q7vinH7
उपक्रमामध्ये सहभाग मोफत असून सहभागींकरिता माहिती खालीलप्रमाणे:-
सदरची स्वच्छता मोहीम भिडे पुल ते म्हात्रे पुल या नदीपात्र रस्त्यावरील नदीपट्ट्यावर आयोजित केली जाणार आहे, संपूर्ण नदीपट्टा ६ विभागामध्ये विभाजित केला आहे या ठिकाणी पोहचण्यासाठी २ प्रवेशद्वारे आहेत.
झोन १, २ आणि ३ बाबा भिडे पूल
झोन ४, ५ आणि ६ खुडे पथ येथून नदीपात्र रस्त्यावर प्रवेश
सहभागींनी त्यांच्या नेमून दिलेल्या झोनमध्ये नदीकाठ स्वच्छ करावा.
प्रत्येक झोनमध्ये सहभागींसाठी हातमोजे आणि मास्क उपलब्ध करून दिले जातील
बॅरिकेड केलेल्या भागात किंवा नदीमध्ये उतरू नये, सहभागीनी बंद बूट परिधान करावेत.
कार्यक्रमादरम्यान रोपे वाटप करण्यात येतील.
तरी या अनोख्या कार्यक्रमात नागरिकांनी उत्साहवर्धक वातवरणात श्रमदान करून, नदी महोत्सव २०२५-स्वच्छ नदी, सुंदर पुणे यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन पुणे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अग्रय या उथळ पाण्यात संचारक्षम पाणबुडीविरोधी चौथ्या जहाजाचे नौदलाकडे हस्तांतरण

नवी दिल्‍ली- कोलकात्याच्या गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स(जीआरएसई)ने स्वदेशी आरेखन...

जगातील सर्वात मोठी जनगणना दोन टप्प्यांत पार पडणार असून पहिला टप्पा एक एप्रिल 2026 पासून होणार सुरू

देशभरातील जनगणतेत 30 लाखांहून अधिक जनगणना कर्मचारी, पर्यवेक्षक आणि...

वापरून झालेल्या बॅटरी साहित्याचा पुनर्वापर करण्यात शास्त्रज्ञांना यश

नवी दिल्‍ली- वापरानंतर क्षमता संपलेल्या लिथियम-आयन बॅटऱ्यांपासून मिळवलेल्या स्पेंट ग्रॅफाईटच्या...

‘सदर्न कमांड’च्या लष्करी कमांडरांनी पुणे येथे ऐतिहासिक वास्तू आणि प्रगत प्रशिक्षण सुविधेचे केले उद्घाटन

पुणे- भारतीय लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख, लेफ्टनंट जनरल धीरज सेठ...