भारतातील सर्वाधिक पर्यावरण-अनुकूल रॉक मिनरल वूल, शाश्वतता व नवोन्मेषात नवे मापदंड
· भारतातील सर्वात पर्यावरण-अनुकूल (ग्रीनेस्ट) रॉक मिनरल वूल – ऱ्हायनो, भारतातील पहिल्या आणि सर्वात मोठ्या इलेक्ट्रिक स्मेल्टरमध्ये उत्पादित केले जाते जे जीवाश्म इंधनाचा कमी वापर करते.
·उत्कृष्ट थर्मल आणि अकॉस्टिक कामगिरीसाठी डिझाइन केलेले, र्हायनो त्याच्या थर्मल, अकॉस्टिक, अग्निरोधक, पाणी-प्रतिरोधक गुणधर्म आणि उच्च संकुचित शक्तीसह आधुनिक बांधकामात परिवर्तन घडवून आणण्यास सज्ज आहे.
· इमारत, औद्योगिक आणि सागरी अनुप्रयोगांमध्ये बहुमुखी,र्हायनो इन्सुलेशन दरवर्षी 45-50% पर्यंत ऊर्जा बचतीचे आश्वासन देते.
मुंबई, 27 नोव्हेंबर 2025: सारडा एनर्जी अँड मिनरल्स लिमिटेडची (BSE: 504614) (NSE: SARDAEN) पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या सारडा मेटल्स अँड अलॉयज लिमिटेडने आज भारतातील सर्वात पर्यावरण-अनुकूल (ग्रीनेस्ट) रॉक मिनरल वूल इन्सुलेशन सोल्यूशन, RHINO लाँच केले. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे झालेल्या CII च्या 23व्या ग्रीन बिल्डिंग काँग्रेस (IGBC) 2025मध्ये हे लॉंच करण्यात आले. उद्योग जगतातील अनेक दिग्गज आणि मान्यवरांच्या उपस्थितीत झालेले हे लाँच भारतातील शाश्वत बांधकाम साहित्य उद्योगातील एक परिवर्तनीय टप्पा आहे.
सात वर्षांचे संशोधन, विकास आणि जागतिक भागीदारीतून तयार करण्यात आलेले RHINO हे भारतातील सर्वात पर्यावरण-अनुकूल (ग्रीनेस्ट) रॉक मिनरल वूल आहे. जीवाश्म इंधनाशिवाय शुद्धीकरण करण्यात आलेले हे RHINO भविष्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. टिकाऊपणा, ऊर्जा संवर्धन आणि उत्कृष्ट कार्यक्षमता एकत्रित करून RHINO इन्सुलेशनची पुनर्परिभाषा करते. एलिट, एंडुरो आणि इको-ग्रीन या तीन प्रकारांसह, RHINO हे एकमेव रॉक मिनरल वूल आहे जे इमारत, औद्योगिक आणि सागरी उद्योगाच्या टिकाऊपणाच्या विविध गरजा पूर्ण करते.
· उत्कृष्ट अग्निसुरक्षा: शून्य धूर उत्सर्जनासह 1000 अंश सेल्सिअस पर्यंत आग प्रतिरोधक. सुरक्षितता सुनिश्चित करते.
· ऊर्जा कार्यक्षमता: संस्थात्मक, व्यावसायिक आणि निवासी इमारतींमध्ये ऊर्जा खर्चात 45-50% कपात करून इन्सुलेशनची पुनर्कल्पना.
· पर्यावरणीय नेतृत्व: शून्य जीवाश्म इंधन वापरासह बाजारात उपलब्ध असलेल्या उत्पादनांच्या तुलनेत 65% पर्यंत कमी CO2 उत्सर्जन साध्य होते.
· प्रगत ध्वनिक नियंत्रण: नको असलेले आवाज शोषण्यास मदत करते, निरोगी आणि शांत राहणीमान आणि कामाचे वातावरण तयार करते.
· वॉटर रिपेलेंट डिझाइन: कार्यक्षमता राखताना इन्सुलेशन आर्द्रतेपासून संरक्षण करते.
· तपमान व्यवस्थापन: उष्णतेची वाढकमी करते आणि थंड होण्यास अनुकूल करते, इमारती आणि घरे जास्त काळ ताजीतवानी, थंड ठेवते आणि लक्षणीयरीत्या कमी ऊर्जा वापरते.
या लाँचिंगप्रसंगी सारडा मेटल्स अँड अलॉयज लिमिटेडचे उपव्यवस्थापकीय संचालक श्री. मनीष सारडा म्हणाले, “पर्यावरणीय व्यवस्थापन आणि नवोपक्रमासह औद्योगिक उत्कृष्टतेचे एकत्रीकरण करण्याच्या सारडा समूहाच्या दृष्टिकोनाचे RHINO हे प्रतीक आहे. 37% जागतिक CO₂ उत्सर्जन* हे इमारतींमुळे होते. मात्र, आमचे उत्पादन हे उत्सर्जन 65% नी कमी करते, जीवाश्म इंधन काढून टाकते आणि ऊर्जा लागत 45-50% ने कमी करते. थोडक्यात म्हणजे, नेट झीरो इमारतींकडे भारताची वेगवान वाटचाल करते. हे प्रॉडक्ट खर्च व लागत घटवते व नफ्यात वृद्धी करते. इमारत उद्योगात परिवर्तन करण्याची आणि अग्निसुरक्षा वाढवणाऱ्या, ध्वनी प्रदूषण कमी करणाऱ्या तसेच तपमान नियमन सुधारणाऱ्या उत्कृष्ट थर्मल इन्सुलेशन आणि ध्वनिक नियंत्रणाद्वारे आधुनिक बांधकाम उंचावण्याची क्षमता या उत्पादनात आहे. IGBC च्या 25 व्या वर्धापनदिनानिमित्त इको फर्स्टचे सीईओ श्री. चित्रंजन कौशिक आणि एन्ड्युरन्स ऍथलिट तसेच भारतीय अभिनेत्री सुश्री सय्यामी खेर यांच्या उपस्थितीत हे लाँच महत्त्वाचे आहे. हे उत्पादन शाश्वत आणि जबाबदार शहरी विकासासाठीच्या आमच्या सामायिक बांधिलकीचे प्रतिबिंब आहे.”
हे लाँच ग्रीन बिल्डिंग काँग्रेस 2025च्या ‘ग्रीन शिफ्ट्स फॉर ग्रीनर टुमारो: डू गुड, फिल गुड – एम्ब्रेस ग्रीन चॉईसेस फॉर अ सस्टेनेबल फ्युचर’ या संकल्पनेशी पूर्णपणे सुसंगत आहे. याच्या माध्यमातून सारडा ग्रुपला भारताच्या ग्रीन बिल्डिंग क्रांतीमध्ये आघाडीवर ठेवते. पाच दशकांहून अधिक काळ, सारडा ग्रुपने नवोन्मेष, जबाबदार वाढ आणि स्वावलंबनासाठी दृढ वचनबद्धतेद्वारे भारताच्या औद्योगिक प्रगतीत योगदान दिले आहे.

