· राष्ट्रव्यापी सीएसआर उपक्रम प्रत्येक भारतीयामध्ये क्रेडिट स्कोअर बाबत जागरूकता निर्माण करतो.
· क्रेडिट शिक्षण सुलभ करण्यासाठी आयुष्यातील चार प्रमुख प्रसंगांचे वर्णन करणाऱ्या टीव्हीसीचे लॉन्चिंग
· मोफत क्रेडिट स्कोअर तपासणी देणारी समर्पित मायक्रोसाइट ScoreKyaHua.bank.in चे अनावरण.
मुंबई – : आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सुरतमधील एका तरुण उद्योजकापासून ते पुण्यातील एका जेन झी व्यावसायिकापर्यंत, जी आयुष्यातील पहिल्याच क्रेडिट कार्डसाठी अर्ज करते आहे ते लखनऊमधील एका जोडप्यापर्यंत जे त्यांचे पहिले घर खरेदी करण्याचे नियोजन करत आहेत – भारतातील लाखो आकांक्षा प्रामुख्याने एका तीन-अंकी संख्येवर अवलंबून आहेत. विशेष म्हणजे, याची माहिती लोकांना क्वचितच असते. ही तीन अंकी संख्या म्हणजे त्यांचा क्रेडिट स्कोअर. माहितीतील ही महत्त्वाची तफावत ओळखून, येस बँकेने ‘स्कोअर क्या हुआ’ हा देशव्यापी सीएसआर उपक्रम सुरू केला आहे. जो भारतीयांना त्यांच्या आर्थिक क्षमता समजून घेण्यासाठी क्रेडिट साक्षरतेसह सक्षम करेल.
‘स्कोअर क्या हुआ’ उपक्रमाच्या केंद्रस्थानी CRIF हाय मार्क द्वारे समर्थित ScoreKyaHua.bank.in ही मायक्रोसाईट आहे, ही या उपक्रमाची नॉलेज पार्टनर आहे. मोफत क्रेडिट स्कोअर तपासणी आणि भारताच्या वेगवेगळ्या क्रेडिट लँडस्केपसाठी तयार केलेली समजण्यास सोपी अशी शैक्षणिक सामग्री देते. पहिल्यांदाच क्रेडिट शोधणाऱ्यांसाठी, क्रेडिट प्रोफाइल तयार करण्यासाठी ही मायक्रोसाईट अगदी सविस्तर मार्गदर्शन करते. त्याचप्रमाणे, विद्यमान कर्जदारांसाठी, वैयक्तिक कर्ज, कार कर्ज किंवा गृह कर्जासाठी अर्ज करत असताना, रोजच्या आर्थिक वर्तनाचा त्यांच्या क्रेडिट स्कोअरवर कसा परिणाम होतो हे समजून घेण्यास हा प्लॅटफॉर्म त्यांना मदत करतो.
येस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत कुमार या प्रसंगी म्हणाले, “आमचा असा विश्वास आहे की, खरी आर्थिक समावेशकता ही क्रेडिट स्कोअरच्या उपलब्धतेपलीकडे जाते. त्याचे सूज्ञपणे व्यवस्थापन करण्यासाठी ज्ञान देखील आवश्यक असते. आपल्या ‘स्कोअर क्या हुआ’ सीएसआर उपक्रमाद्वारे येस बँक प्रत्येक भारतीयाला क्रेडिट स्कोअर म्हणजे काय आणि तो कसा सुधारायचा हे समजून घेण्यास मदत करण्यासाठी एक राष्ट्रीय चळवळ चालवत आहे. याच्या माहितीबाबत असलेली तफावत दूर करणे आणि जबाबदार क्रेडिट वर्तनाला प्रोत्साहन देऊन क्रेडिट पात्र व्यक्तींचा समूह वाढवणे हे आमचे उद्दिष्ट आहे. आर्थिक भविष्य घडविण्यासाठी आम्ही लोकांना योग्य ज्ञान आणि साधनांसह सक्षम करून आर्थिकदृष्ट्या आत्मविश्वासपूर्ण भारत निर्माण करण्यात योगदान देण्याचा प्रयत्न करत आहोत.”
CRIF हाय मार्कचे अध्यक्ष, CRIF इंडिया आणि साउथ एशियाचे प्रादेशिक व्यवस्थापकीय संचालक, सचिन सेठ म्हणाले, “CRIF क्रेडिट स्कोअर प्रदान करून ‘स्कोअर क्या हुआ’साठी नॉलेज पार्टनर म्हणून येस बँकेसोबत सहकार्य करण्यास आम्ही उत्सुक आहोत. क्रेडिट जागरूकता वाढवणे आणि तिला प्रोत्साहन देणे, हे आमचे ध्येय आहे. कारण क्रेडिट आणि त्याचा परिणाम समजून घेणे हे आर्थिक समावेशनाला चालना देण्याबरोबरच मजबूत, चिरस्थायी आर्थिक प्रवास उभारण्याच्या दृष्टीने आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांसाठी महत्त्वाचे आहे. व्यावहारिक दृष्टिकोन आणि साधने सामायिक करण्याचे उद्दिष्ट ठेवतो जे प्रत्येकाला त्यांच्या क्रेडिट प्रवासाची जबाबदारी स्पष्टता आणि आत्मविश्वासाने घेण्यास सक्षम करतात.”
सोप्या भाषेत क्रेडिट स्कोअर समजावून सांगण्यासाठी येस बँकेने चार टेलिव्हिजन जाहिराती तयार केल्या आहेत ज्या रोजच्या जगण्यातील आर्थिक शिक्षणाचे महत्त्व सांगतात. ‘स्कोअर क्या हुआ‘ हे येस बँकेच्या अशा भारताच्या दृष्टिकोनाचे प्रतिनिधित्व करते जिथे आर्थिक साक्षरता हा एक मूलभूत अधिकार आहे – जिथे जयपूरमधील तरुणाला मुंबईतील तरुणाप्रमाणेच क्रेडिट ज्ञानाची माहिती आणि उपलब्धता असेल.
मायक्रोसाइटमध्ये क्युरेटेड ब्लॉग्ज, माहितीपूर्ण व्हिडिओज, क्रेडिट स्कोअरबद्दलच्या सामान्य गैरसमजुती दूर करणारे मिथ-बस्टर्स आणि एक परस्परसंवादी क्रेडिट सिम्युलेटर आहे जे वेगवेगळ्या आर्थिक निर्णयांचा त्यांच्या स्कोअरवर कसा परिणाम होऊ शकतो हे पाहण्यास ग्राहकांना मदत करते.
आर्थिक समावेशनाच्या दिशेने भारत वेगाने प्रवास करत असताना, ‘स्कोअर क्या हुआ’ हे प्रत्येक नागरिकाला त्यांच्या क्रेडिट स्कोअरची शक्ती समजून घेण्यासाठी एक खुले आमंत्रण आहे. सुरुवात करण्यासाठी ScoreKyaHua.bank.in ला भेट द्या.

