100 वर्षांहून अधिक काळाच्या कामगिरीच्या आधारे, हे कंडेन्सर जागतिक स्तरावर प्रमुख संयुक्त
सायकल पॉवर प्लांटना सेवा देतील
मुंबई, 27 नोव्हेंबर 2025: जागतिक वीज प्रकल्पांसाठी नऊ इकोलेअर®-आधारित सरफेस कंडेन्सर्सच्या दोन प्रमुख ऑर्डर गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपच्या प्रोसेस इक्विपमेंट व्यवसायाने मिळवल्या आहेत.
गोदरेजची वाढती जागतिक उपस्थिती आणि जगभरातील प्रगत अभियांत्रिकी उपाय वितरित करण्याच्या कंपनीच्या वचनबद्धतेला हा टप्पा अधोरेखित करतो. तसेच गुणवत्ता, सुरक्षा आणि विश्वासार्हतेच्या कठोर मानकांची पूर्तता करत जागतिक प्रकल्पांसाठी महत्त्वाची उपकरणे पुरवण्याच्या भारताच्या क्षमतेवरील ग्राहकांचा वाढता विश्वासही दर्शवितो.
या कामगिरीबद्दल गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपच्या प्रोसेस इक्विपमेंट बिझनेसचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख हुसेन शरियार म्हणाले, “जगभरातल्या ग्राहकांनी आमच्या कौशल्यावर ठेवलेल्या विश्वासाची ही ऑर्डर पुष्टी करते. आम्हाला विश्वास आहे की, उत्कृष्टतेची सुरुवात उत्तम डिझाइनपासून होते, आमचे इकोलेअर® तंत्रज्ञान हेच तत्त्वज्ञान प्रतिबिंबित करते. जागतिक वीज प्रकल्पांसाठी प्रगत कंडेन्सरची रचना आणि उत्पादन करून आम्ही हे सिद्ध करत आहोत की, भारतीय कंपन्या नावीन्य, कार्यक्षमता आणि विश्वासार्हतेवर स्पर्धा करणाऱ्या जागतिक मानकांची पूर्तता करण्यासाठी जागतिक दर्जाचे उपाय देऊ शकतात.”
गोदरेजने 2018मध्ये विकत घेतलेले इकोलेअर® सरफेस कंडेन्सर तंत्रज्ञान, शतकाहून अधिक काळ नावीन्यपूर्णता आणि उत्कृष्ट कामगिरीचे प्रतिनिधित्व करते. यामुळेच जगभरात 3,600 हून अधिक कंडेन्सर पुरवले जातात. इकोलेअर® कंडेन्सर उत्कृष्ट थर्मल कार्यक्षमता आणि विश्वासार्ह कामगिरी देण्यासाठी कस्टम-डिझाइन केलेले आहेत.
डिझाइनपासून डिस्पॅचपर्यंत, गोदरेजचा प्रक्रिया उपकरण व्यवसाय तेल आणि वायू, वीज तसेच हायड्रोजन क्षेत्रांसाठी महत्त्वपूर्ण, कस्टम-इंजीनिअर्ड उपकरणे पुरवतो.
प्रगत अभियांत्रिकी आणि जबाबदार उत्पादनाची रचनात्मक विचारसरणीशी सांगड घालत,गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुप केवळ जागतिक उद्योगांना बळ देत नाही तर अधिक शाश्वत, भविष्यासाठी योग्य अशा जगाला आकार देतो आहे – हे भारताच्या ‘मेक इन इंडिया, फॉर द वर्ल्ड’ या दृष्टिकोनाचे खरे मूर्त स्वरूप आहे.

