पुणे-आपल्या प्रभागात , दुबार, शेजारच्या प्रभागातील , किंवा पूर्ण नाव नसलेले अशा सुमारे १० हजार मतदारांच्या डुप्लिकेट अथवा बोगस म्हणता येतील अशा नावांचा समावेश करण्यात आल्याचा गौप्यस्फोट माजी नगरसेवक कॉंग्रेसचे युवा नेते अविनाश रमेश बागवे यांनी आज संविधान दिनी काढलेल्या यात्रेनंतर पत्रकार परिषदेतून केला आणि थेट पुरावे देत विचारले याहून अधिक कोणते हवेत पुरावे …..?
ते म्हणाले,’ प्रभाग क्र. 22 मधील मतदार यादीतील गंभीर अनियमितता व मतदारांच्या नावांची झालेली मोठ्याप्रमाणावरची गडबड हे नजरचुकूने झालेले आहे कि हेतुपुरस्सर दूषित हेतूने केले आहे हे तपासणे गरजेचे आहे.महाविकास आघाडीने नुकतेच पुणे महानगरपालिकेत आयुक्तांना एक सविस्तर निवेदन दिले आहेच
मोठ्या प्रमाणात Duplicate Entries (डुप्लिकेट नावे), एकाच व्यक्तीची एकाहून अधिक वेळा नोंदवली गेली आहेत. यामुळे मतदार यादीची सत्यता धोक्यात आली आहे आणि निवडणुकीची पारदर्शकता कमी झाली आहे.माझ्या मनपा प्रभाग क्र 22 काशिवाडी डायसप्लॉट मध्ये एकूण 3600 दुबार मतदार आहे. तसेच शेजारील प्रभाग क्र 23 रविवार पेठ – नानापेठ मध्ये 2154 व प्रभाग क्र. 26 गुरुवार पेठ घोरपडे पेठ मध्ये 1278 इतके मोठ्या प्रमाणात दुबार मतदार आहेत. तसेच इतर प्रभागातील अंदाजे 5200 मतदार माझ्या प्रभाग क्र 22 मध्ये समाविष्ट झालेले आहे. वरील त्रुटी मुळे जवळ जवळ 10000 मतदारांवर परिणाम होत आहे जे अत्यंत गंभीर आहे. प्रभाग 22 काशिवाडी- डायसप्लॉट मध्ये मृत व्यक्तींची नावे हटवली गेलेली नाहीत. माझ्या स्वतःच्या कुटुंबातील आजी, चुलते व इतर 3 मृत व्यक्तींची नावे मतदार यादीत आहे. ही नावे रद्द करण्यासाठी मी स्वतः दोन वेळा अर्ज केलेला आहे. हे अत्यंत चिंताजनक असून चुकीच्या मतदानाला व गैरप्रकारांना वाव देते.
मोठ्या प्रमाणात स्थलांतर झालेले मतदार अद्याप यादीत असून गेल्या काही वर्षांत हजारो नागरिक पुण्याच्या उपनगरात स्थलांतरित झाले आहेत. परंतु त्यांची नावे मतदार यादीतून आत्तापर्यंत काढलेली नाहीत.तसेच प्रभाग क्र. 22 मधील मतदार प्रभाग क्र 23 व 26 मध्ये समाविष्ट केलेले आहे.
तसेच माझ्या प्रभागात हजारो संदिग्ध मतदारांच्या नावांचा समावेश आहे. कोणाचे केवळ पहिले नाव आहे तर कोणाचे आडनाव नसलेले नाव आहे या नावावरून एखाद्या विशिष्ट व्यक्तीची ओळख पटू शकत नाही. जसे की तसेच अनेक मतदारांचे मतदान केंद्र दुसऱ्या प्रभागात आहे. तेही तत्काळ दुरुस्त करावे. BLO व Electoral Registration Officer ERO यांच्या तपासणीतील त्रुटी प्रत्यक्ष पत्ते पडताळणी योग्य पद्धतीने करण्यात आलेली नाही. मतदार नाव नोंदणीच्या व्हेरिफिकेशनमध्ये प्रचंड दुर्लक्ष झाले आहे.

