वंदना गुप्ते यांना ‘रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर… 

Date:

मुंबई- मराठी नाट्य कलाकार संघातर्फे दिला जाणारा ‘रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांना जाहीर झाला आहे. जागतिक रंगकर्मी दिवसाचे औचित्य साधून या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. 

व्यावसायिक रंगभूमीवर काम करणाऱ्या रंगकर्मींचा हक्काचा एक दिवस असावा आणि त्या निमित्ताने रंगकर्मींच्या कार्याचा गौरव व्हावा, या उद्देशाने मराठी नाट्य कलाकार संघातर्फे दरवर्षी ‘जागतिक रंगकर्मी दिवस’ साजरा करण्यात येतो. मराठी रंगभूमीसाठी सर्वस्व वाहिलेल्या नटवर्य भालचंद्र पेंढारकर यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून २५ नोव्हेंबर हा दिवस, २०१४ या वर्षापासून कलाकार संघातर्फे ‘जागतिक रंगकर्मी दिवस’ म्हणून साजरा केला जातो आणि या दिवशी ‘रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार’ सन्माननीय रंगकर्मीला प्रदान केला जातो. यंदा हा पुरस्कार वंदना गुप्ते यांना जाहीर करण्यात आला आहे. 

दरवर्षी २५ नोव्हेंबर रोजी हा पुरस्कार सोहळा कलावंत आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहाने आयोजित केला जातो. मात्र यंदा महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांवर ओढवलेल्या पूर परिस्थितीच्या संकटामुळे, हा सोहळा जाहीररित्या न करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यामुळे हा पुरस्कार, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथशिंदे यांच्या हस्ते त्यांच्या दालनात लवकरच प्रदान करण्यात येणार आहे. तसेच सदर सोहळ्यासाठी येणाऱ्या खर्चाची रक्कम मुख्यमंत्री पूरग्रस्त सहाय्यता निधीसाठी देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला असल्याची माहिती मराठी नाट्य कलाकार संघाचे अध्यक्ष सुशांत शेलार यांनी दिली आहे. 

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ही मराठी नाट्य कलाकारांची मातृसंस्था असून, मराठी नाट्य कलाकार संघ ही नाट्य परिषदेची व्यावसायिक रंगभूमीवरील रंगकर्मींसाठी कार्य करणारी अधिकृत घटक संस्था आहे. या संस्थेच्या वतीने व्यावसायिक रंगकर्मींसाठी अनेक हिताचे उपक्रम राबविण्यात येतात. आतापर्यंतच्या ‘जागतिक रंगकर्मी दिवस’ सोहळ्यांमध्ये भालचंद्र पेंढारकर, मधुकर तोरडमल, किशोर प्रधान, शोभा प्रधान, गंगाराम गवाणकर, विक्रम गोखले, दिलीप प्रभावळकर, अशोक सराफ, उषा नाडकर्णी, रोहिणी हट्टंगडी व मोहन जोशी या कलाकारांना मराठी नाट्य कलाकार संघातर्फे ‘रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

उद्या दुपारी निश्चित होतील पुण्याचे महापौर आणि उपमहापौर ..

पुणे- महापालिकेत भाजपचे ११९ नगरसेवक एवढे बळ असल्याने हा...

महापालिकेचे नगर अभियंता प्रशांत वाघमारे निवृत्त,आता अनिरुद्ध पावसकर नवे नगर अभियंता ..

पुणे : पुणे महापालिकेच्या लोकप्रिय अधिकाऱ्यांत ज्यांची गणना होत...

एनडीएमध्ये येण्यासाठी सोबत यायचे असेल त्यांनी स्पष्ट करावी: तटकरेंचा थेट पवारांना सल्ला

सातारा :आज आम्ही एनडीमध्ये भाजपसोबत सत्तेत आहोत. देशाच्या विकासासाठी...