भारताच्या वैविध्यपूर्ण लग्न समारंभाचा उत्सव
नोव्हेंबर 25, 2025:
प्रत्येक भारतीय वधू तिच्यासोबत भावनांचे एक जग घेऊन जाते. त्यात तिच्या स्वतःच्या अनेक आठवणी असतात. ती ज्या रीतिरिवाजांना बघत मोठी झाली, ती ज्या संस्कृतीशी संबंधित आहे, ज्या आठवणी तिने हृदयाच्या जवळ जपल्या आहेत आणि तिच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या दिवसांपैकी एकाची ओळख ठरतील असे दागिने, या सगळ्या गोष्टी त्यात असतात. जगातील सर्वात मोठ्या सोने आणि हिऱ्यांच्या रिटेल चेनपैकी एक असलेल्या मलबार गोल्ड अँड डायमंड्सने भारतातील समृद्ध, सांस्कृतिक वारशातील वधूच्या दागिन्यांचे महत्त्व फार पूर्वीपासून समजून घेतले आहे. वधूच्या श्रेणीतील दागिन्यांमध्ये मलबार गोल्ड अँड डायमंड्सने विचारपूर्वक क्युरेट तसेच विकसित केलेले डिझाइन एकत्र आणले आहेत. ज्यामुळे प्रत्येक वधूच्या परंपरांचा आदर करणारे शुद्धता, हेतू आणि कारागिरीने तयार केलेले दागिने सुनिश्चित होतात. वधूच्या कारागिरीतील सखोल कौशल्यासह, ब्रँडने देशभरातील वधूंच्या विशिष्ट परंपरांचा आदर करणारे डिझाइन तयार करण्याचा एक अतुलनीय वारसा निर्माण केला आहे.
एक महत्त्वाचा टप्पा गाठत, मलबार गोल्ड अँड डायमंड्सने आज त्यांच्या प्रमुख ब्राइड्स ऑफ इंडिया अभियानाच्या 15व्या आवृत्तीचे अनावरण केले, जी भारतातील सर्वात मोठ्या आणि सर्वात अपेक्षित ब्राइडल प्रॉपर्टींपैकी एक म्हणून ओळखली जाते. या वर्षीच्या आवृत्तीत 22 वधू आणि 10 सेलिब्रिटी एकत्र आले आहेत – प्रार्थना बेहेरे, आलिया भट्ट, करीना कपूर खान, एनटीआर, कार्ती, अनिल कपूर, श्रीनिधी शेट्टी, रुक्मिणी मैत्र, सब्यसाची मिश्रा आणि मानसी पारेख, हे सर्व या मोहिमेचा विस्तार, वैविध्य तसेच भावनिक खोली दर्शवते.
शुभजीत मुखर्जी यांनी संगीतबद्ध केलेल्या या जाहिरातीचे दिग्दर्शन अभिषेक वर्मन यांनी केले आहे. या जाहिरातीत भारताच्या वेगवेगळ्या भागातील वधू संस्कृतींचे सार टिपणारे तसेच प्रत्येक वधूच्या कथेला आकार देणाऱ्या विधि, भावना तसेच वारसा साजरे करणारे दृश्य आणि संगीतमय कथानक एकत्र आणले आहे.
15व्या आवृत्तीच्या महत्त्वाबद्दल विचारले असता, मलबार गोल्ड अँड डायमंड्सचे अध्यक्ष श्री. एम.पी. अहमद म्हणाले: “दरवर्षी आयोजित करण्यात येत असलेला ब्राइड्स ऑफ इंडिया उपक्रम म्हणजे या देशातील वधूंप्रति आमची कृतज्ञता आहे. आणि हे 15वे वर्ष तर आमच्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. स्वतःचे स्वातंत्र्य जपतानाच वधू परंपरेचा देखील कसा आदर करतात हे आम्ही अनेकदा अधोरेखित केले आहे. ही आवृत्ती त्या परंपरांची खोली दर्शवते – आठवणी, विधि आणि नातेसंबंध जे तिची ओळख आहे. पारदर्शकता आणि गुणवत्ता हमीसाठी मलबारची असलेली वचनबद्धता लक्षात घेता, प्रत्येक कुटुंबाला अर्थपूर्ण आणि विश्वासार्ह दागिने निवडण्याचा आत्मविश्वास वाटावा अशी आमची इच्छा आहे.”
उत्सव भारताच्या विविधतेचा:
भारतीय वधूच्या वैविध्यपूर्ण परंपरांचा मलबार गोल्ड अँड डायमंड्स ब्राइड्स ऑफ इंडियाने नेहमीच सन्मान केला आहे आणि या आवृत्तीत देशातील वैविध्यपूर्ण श्रेणीला केंद्रस्थानी आणले आहे. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत प्रत्येक भागात हे कलेक्शन आहे. विशेष म्हणजे यात प्रत्येक सांस्कृतिक ओळख जपणारे दागिने आहेत. यामध्ये राजस्थानची राजेशाही पोल्की कारागिरी, तामिळनाडूची मंदिर-प्रेरित सुवर्ण कलाकृती, केरळची पारंपरिक कसावू-प्रेरित सोन्याचे दागिने आणि बंगाली दागिन्यांच्या वारशाची व्याख्या करणारे गुंतागुंतीचे आकृतिबंध यांचा समावेश आहे.
देशभरात उपलब्ध असलेलं वैविध्यपूर्ण दागिने:
या संग्रहाला आणखी खास बनवणारी गोष्ट म्हणजे त्याची संपूर्ण भारतात असलेली उपलब्धता. यामुळे देशाच्या कोणत्याही भागातील वधूला, कुठेही, कोणत्याही सांस्कृतिक शैलीतील दागिने निवडण्याची संधी मिळते. चेन्नईमधील वधू राजस्थानी पोलकी सेट निवडू शकते, त्याचप्रमाणे दिल्लीतील वधू दक्षिणेतील प्रसिद्ध टेम्पल ज्वेलरी घालू शकते. मलबारचा विस्तृत डिझाइन संग्रह आणि कस्टमायझेशन कौशल्याचे हे प्रतिबिंब आहे.
2025च्या आवृत्तीत मलबारच्या खास वधूसाठी असलेल्या कलाकृती एकत्र आणल्या आहेत, ज्यात भारतीय वारसा आणि मंदिर कलेपासून प्रेरित असलेला संग्रह, माणिक, पन्ना आणि नीलम रत्नांनी समृद्ध प्रेशिया संग्रह आणि समकालीन तरीही परंपरागत हिऱ्यांचा संग्रह समाविष्ट आहे जो भारताच्या सांस्कृतिक परिदृश्यातून काढलेल्या आकृतिबंधांसह तेजस्वी हिऱ्यांचे मिश्रण करतो. एकत्रितपणे, हे संग्रह भारतीय वधूच्या ओळखीची एक ठळक टेपेस्ट्री तयार करतात आणि गेल्या 15 वर्षांत ब्राइड्स ऑफ इंडियाने उभारलेला समृद्ध वारसा पुढे चालू ठेवतात.
वधूच्या श्रेणीतील प्रत्येक वस्तू मलबार गोल्ड अँड डायमंड्सच्या कुशल कारागिरांनी डिझाइन, क्युरेट आणि घडवली आहे, ज्यामुळे तिच्या संस्कृतीचा, तिच्या विधिंचा आणि तिच्या लग्नातील शुभ क्षणांचा सन्मान करणारे दागिने निश्चित ठरवले जातात.
महाराष्ट्रीयन वधू शतकानुशतकांच्या जुन्या परंपरेला आधुनिकतेशी जोडते. खेळकर पण शांत, आनंद आणि गांभीर्य यांचे अनोखे मिश्रण त्यात दिसते. तिचा वारसा ती आत्मविश्वासाने पुढे नेत असते. मलबार गोल्ड अँड डायमंडचे दागिने तिच्या याच वेगळ्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब आहेत – तेजस्वी, भावपूर्ण आणि मराठी वधूच्या कालातीत ओळखीचा सन्मान करण्यासाठी डिझाइन केलेले.
प्रार्थना बेहेरे म्हणाली, “महाराष्ट्रीयन विवाह हे अर्थपूर्ण प्रतीकांनी परिभाषित केले जातात – नथ, मुंडावळ्या, हिरव्या बांगड्या, हे अलंकार आयुष्यातील एका नवीन अध्यायाचे प्रतीक आहेत. या तपशीलांमध्ये सांस्कृतिक अभिमान आहे. हे सगळे तपशील ब्राइड्स ऑफ इंडियामध्ये अगदी बारकाईने उतरतात, आपल्या परंपरांचे सार अधोरेखित करते आणि आजच्या वधूशी नैसर्गिकरित्या जोडले जाऊ शकतील अशा डिझाइन सादर करते.”
आलिया भट्ट म्हणाली,”लग्नात प्रत्येक वधू स्वतःचे व्यक्तिमत्त्व जपण्याचा प्रयत्न करते, कोणतीही परंपरा तिच्या नजरेतून कशी दिसते, त्या पद्धतीने ती व्यक्त करते. ब्राइड्स ऑफ इंडिया याचेच प्रतिनिधित्व करते. दागिन्यांच्या माध्यमातून मलबार हेच सुंदरपणे टिपते जे अर्थपूर्ण, समकालीन आणि तिच्या स्वतःच्या कथेशी जोडलेले आहे, असे तिला वाटते.”
करीना कपूर खान म्हणाली, “प्रत्येक वधू ज्या परंपरांसोबत वाढते त्याच परंपरा जपते आणि लग्नाच्या प्रत्येक विधितून आणि क्षणातून तो वारसा जिवंत करते. ब्राइड्स ऑफ इंडियाबद्दल मला जे आवडते ते म्हणजे, वधूला केंद्रस्थानी ठेवून मलबार या कथांना एका सांस्कृतिक छत्राखाली एकत्र आणते. या मोहिमेचा भाग असणे मला नेहमीच खास वाटले आहे कारण ते आपले मूळ विसरत नाहीत आणि प्रामाणिकपणा तसेच अभिजाततेने ते साजरे करतात.”
अनिल कपूर म्हणाले, “भारतातील लग्नसमारंभ हे उर्जेने भरलेले असतात – संगीत आणि सर्वांना एकत्र आणणारे उत्सव. पण यात एक भावनिक क्षण देखील दडलेला असतो. आपल्या आसपास असलेल्या लोकांच्या भाव-भावनांमधून वधूला आपले जीवन बदलणार असल्याचे जाणवते. ब्राइड्स ऑफ इंडियाबद्दल मला आवडणारी गोष्ट म्हणजे संतुलन: उत्सवांची भव्यता आणि वधूचा जीवन बदलणारा एक प्रवास. या दागिन्यांमध्ये हे दोन्ही बारकावे अत्यंत सुंदरतेने प्रतिबिंबित होतात.”
मलबार गोल्ड अँड डायमंड्स 15व्या आवृत्तीसह भारतातील आघाडीचे वन-स्टॉप ब्राइडल डेस्टिनेशन म्हणून आपले स्थान अधिक मजबूत करत आहे, जे सोने, हिरे, प्लॅटिनम तसेच रत्नजडित दागिन्यांमध्ये संस्कृती जपत आणि समकालीन डिझाइन ऑफर करते. त्याची अनोखी डिझाइन आणि जपलेली सांस्कृतिकता यामुळे आपले वाटतील अशा दागिन्यांच्या शोधात असलेल्या कुटुंबांना मलबार सेवा देत आहे. मलबार गोल्ड अँड डायमंड्स वधूंना त्यांचा वारसा, त्यांची ओळख आणि ते जपून ठेवतील अशा आठवणी प्रतिबिंबित करणारे दागिने एक्सप्लोर करण्यासाठी आमंत्रित करते.

