पुणे- डिजिटल इंडिया होत असताना पुण्यात काही अधिकारी एकीकडे निवडणूक आयोगाच्या नावाने डिजिटल मिडीयाला विरोध करत आहेत आणि प्रिंट ला पायघड्या घालीत आहेत तर दुसरीकडे मेट्रोने काल अचानक येरवडा मेट्रो स्टेशन वर प्रिंट तिकीट देणे बंद केले आणि डिजिटल म्हणजे मोबाईलवर तुमच्या डिजिटल तिकीट घेण्याचा आग्रह सुरु केला यामुळे अत्यंत साधा मोबाईल असलेल्या एका आजीबाईंची मोठ्ठी पंचाईत झाली पण इथे मात्र मेट्रोने डिजिटल इंडिया चा धोशा लावला आणि तुमच्या मोबाईल वर वॉट्सअॅपवर २ तिकिटे पाठविल्याचे सांगून त्यांची बोळवण करण्याचा प्रयत्न केला . आज्जीबाई कडे ना whatsaap ना इन्टरनेट , साधा मोबाईल … त्यांनी पेपर तिकीट देण्याची विनंती केली असता, उपस्थित कर्मचारी भूषण शिंदे, रणजीत तावडे, जितेंद्र रामटेके, प्रवीण इंगळे यांनी तिकीट देण्यास नकार देत अवमानकारक वर्तन केले.या घटनेने आम आदमी पार्टीने संताप व्यक्त केला असून …. जिथे प्रिंट तिकीट देणे आवश्यक आहे तिथे असला शहाणपणा चालणार नाही असा इशारा आम आदमी पार्टीने यावेळी दिला
राज्य समन्वयक अमित म्हस्के,शहर उपाध्यक्ष श्रद्धा शेट्टी,शहराध्यक्ष, कामगार आघाडी संजय कोनेसंघटन सह-मंत्री मनोज शेट्टी,युवा आघाडी सचिव ॲड. रवी वडमारे,सदस्य अरुण केदारी यांनी येथे धाव घेतली आणि मेट्रोला सुनावले आहे.
या प्रकरणी ते म्हणाले,दिनांक २४/११/२०२५, सोमवार रोजी सायंकाळी ५ वाजता, पक्षाचे संघटन सहमंत्री मनोज शेट्टी यांच्या आई व आज्जी पुणे मेट्रोने प्रवास करण्यासाठी येरवडा मेट्रो स्टेशन येथे तिकीट काढण्यासाठी गेल्या असता अत्यंत गंभीर अशी घटना घडली.तिकीट काउंटरवर असताना एका महिला कर्मचारीने त्यांच्या मोबाईलवर डिजिटल पद्धतीने वॉट्सअॅपवर दोन प्रवासी तिकीट डाउनलोड करून दिले.
मात्र संबंधित प्रवासी निरक्षर आणि वयवृद्ध असल्याने त्यांच्याकडे फिचर फोन (साधा मोबाईल) होता व डिजिटल तिकीट वापरणे त्यांना शक्य नव्हते. त्यामुळे पुढील प्रवास कसा करायचा, असा प्रश्न शेट्टी यांनी कर्मचाऱ्यांना विचारला.पेपर तिकीट सुविधा बंद असल्यामुळे हा त्रास निर्माण झाला असून पुणेकरांना डिजिटल तिकीटाच्या नावाखाली होणारा त्रास असह्य आहे.यामुळे आम आदमी पार्टीने पुणेकरांच्या सोयीसाठी आणि विशेषतः वरिष्ठ नागरिक,निरक्षर प्रवासी,फिचर फोन वापरणारे नागरिक आणि ज्यांना हवे त्यांना सर्व मेट्रो स्टेशनवर पेपर तिकीट तात्काळ सुरू करावे.अन्यथा…पेपर तिकीट सुरू न झाल्यास आम आदमी पार्टी च्या वतीने मेट्रो रोको आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा दिला आहे.

