चाहत्यांना म्हणाले , मी व्यवस्थितच , तुम्ही अफवांवर विश्वास ठेऊ नका
पुणे– आज सकाळी बोलताना ज्येष्ठ आणि ख्यातनाम अभिने ते किरण कुमार म्हणाले, मी व्यवस्थितच आहे , तुम्ही अफवानावर विश्वास ठेऊ नका , मात्र याबाबत मी मुंबई सायबर क्राईम कडे तक्रार केली आहे. आणि अशा वेड्यांच्या मी तरी नडला लागून माझा वेळ खराब करणार नाही. आता माझे दिल्लीत शुटींग सुरु आहे .पण पुण्यात आल्यावर तुम्हा सर्वांना निश्चित भेटेन .
किरण कुमार यांना बऱ्याच दिवसांपासून काम नसल्याने ते वाईट परिस्थितून जात असल्याच्या सोशल मीडियातील पोस्ट व्हायरल होत गेल्या आहेत. किरण कुमार यांचे फोटो आणि काही अर्धवट अत्यंत वृद्ध भिक्षुक वाटतील असे पण चेहरा दिसणार नाही असे फोटो टाकून काही कंटकांनी किरण कुमार यांची बदनामी चालविली आहे. याबाबत आज सकाळी त्यांच्याशी बोलणे झाले असताना त्यांनी सांगितले कि , मी एकदम व्यवस्थित आहे , लोक टीआरपी मिळविण्यासाठी काहीही करतात ,सचिन तेन्दुल्कार्लाही त्यांनी सोडले नाही . पण मी या प्रकारामुळे सायबर क्राईम कडे तक्रार केली आहे. आता मी दिल्लीत चित्रीकरणासाठी व्यस्त आहे . एका वेब सेरीज चे चित्रीकरण करतोय पण तुम्ही अफवांवर विश्वास ठेऊ नका , पुण्यात आलो कि मी तुम्हाला निश्चित भेटत असतो .