अतिरेकी हल्ले, बॉम्बस्फोट, कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा.. मात्र सरकारी संपत्तीच्या लुटीला राजकीय थारा..!
⁃काँग्रेस’ची प्रखर टिका
पुणे दि २३ –
२०१४ मध्ये हाती आलेल्या व “आर्थिक महासत्ता होऊ घातलेल्या” भारत देशाची, दुर्दशा करून ही ‘स्वकर्तबगारीचा पुरुषार्थ’ सांगु शकत नसल्याने, भाजप नेते तथ्यहीन, दिशाभूल करणारी व बेजबाबदार वक्तव्ये करण्यात स्वतःला धन्य मानतात हे देशाचे दुर्दैव असुन, जनते सोबत प्रतारणा असल्याची घणाघाती टिका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस‘चे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, २६/११ च्या हल्ल्यात अतिरेक्यांना जागीच पकडून त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावणाऱ्या तत्कालीन “काँग्रेस सरकारने” अतिरेक्यांना पकडण्याच्या कारवाई पेक्षा ही ‘पाकिस्तान’ वर (?) हल्ला करण्याची, देवेंद्र फडणवीस अपेक्षा ठेवतात..! मात्र काँग्रेस सरकारने पकडलेले खतरनाक अतिरेकी मसूद अजहर सह चौघांना, केंद्रात भाजप (१९९९ – २००४) सत्तेत असतांना कंदहार विमानतळावर गुडघे टेकत सोडून दिल्याचे सोईस्कर विसरतात…!!
पंतप्रधान मोदी, विना निमंत्रण पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफांच्या वाढदिवसा निमित्त ‘केक व बिर्याणी’ खायला जातात.
लाहोर बस यात्रा काढणाऱ्या तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीजीं च्या नंतर नरेंद्र मोदी व लालकृष्ण अडवानी हे केवळ भाजप नेतेच् पाकिस्तान ला गेल्याचा इतिहास साक्ष आहे..!
मात्र काँग्रेस कालावधीत एकही नेता आगंतुक पणे पाकिस्तान ला गेल्याची घटना इतिहासात नाही.
अमेरिकेचे अध्यक्ष ड्रोनाल्ऱ्ड ट्रंम्प च्या हातचे बाहुले बनणाऱ्यांनी व त्यांच्या इशाऱ्यावर पाकिस्तानवरील कारवाई थांबवणाऱे भाजप नेते काँग्रेस’ला उपदेशाचे डोस देऊन स्वतःचे हसे करून घेत आहेत.
उरी, पठाणकोट, पुलवामा, पहेलगाम व दिल्ली’त आलेले अतिरेकी व प्रचंड प्रमाणात वारंवार आलेली हजारो किलो आरडीएक्स स्फोटकांचा सुगावा का लागला नाही (?) आपली सुरक्षा यंत्रणा वारंवार का अपयशी ठरली (?) याचे उत्तर मात्र बेजबाबदार व कोडगेपणाने देत नाहीत, याचे ना ऊत्तरदायीत्व ना खेद ना खंत..!
आत्मनिर्भर”ची भाषा करणारे व करोडोंच्या सरकारी खर्चाने स्वतःचीच पाठ थोपटून घेणारे भाजप’चे श्रेयजीवी नेते, दुबई’च्या एअर शो मध्ये नुकतेच अचानक कोसळलेले ‘तेजस फायटर विमान’ हे अमेरिकन इंजिन व फ्रान्स, ईस्राईल च्या पार्ट वर का बनवले गेले होते (?) याचे व या अनुषंगानेच संरक्षण दल प्रमुखांनी, भारतीय सैन्य सामग्री वेळेत मिळत नसल्याची, दुसऱ्यांदा केलेली जाहीर तक्रारी वर केंद्र सरकार व संबंधित मंत्री मुग गिळून का गप्प बसलेत (?) असा संतप्त सवाल ही वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला.
भ्रष्टाचार, सरकारी जमीन, महसूल व स्टँम्प ड्युटीच्या लूटीची प्रकरणे सत्ता टिकवण्याच्या स्वार्थासाठी दडपण्याची वृत्ती भाजप नेत्याच्या ठायी बोकाळत आहे. एका रात्रीत कॅसिनो मध्ये कोट्यवधी रुपये उधळणाऱ्या महसुल मंत्री बावनकूळे काँग्रेसवर उथळ टीका करण्या पलीकडे काहीही करू शकत नाहीत, हीच त्यांची सत्तेसाठी भ्रष्टाचाराशी तडजोड करण्याची अगतिकता असल्याचे ही प्रवक्ते गोपाळदादा तिवारी म्हणाले..!
विमाने कोसळली.. तशी भाजप’ची विश्वासार्हता भुईसपाट..
Date:

