पुणे- कोरेगाव पार्कातील द हेवन हॉटेलवर छापा टाकून पोलिसांनी विदेशी आणि परराज्यातील महिलांकडून करवून घेतल्या जाणाऱ्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला. पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखेने हि कारवाई केली .
हॉटेलमध्ये चालु असलेल्या वेश्या व्यवसायावर छापा टाकुन ०१ पिडीत विदेशी महिला व ०२ परराज्यातील महिलांची सुटका केली आणि एका आरोपीला अटक केली .
दिनांक २०/११/२०२५ रोजी पोलीस अंमलदार तुषार भिवरकर अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा, पुणे शहर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कोरेगाव पार्क पुणे परिसरामध्ये इसम (एजंट) हा विदेशी व परराज्यतील मुलींना वेश्या व्यवसायासाठी आणुन त्यांचेकडुन वेश्या व्यवसाय करुन घेत असलेबाबत माहिती प्राप्त झाली. या बाबत पोलीस निरीक्षक श्रीमती आशालता खापरे यांचे मार्गदर्शनाखाली तात्काळ बातमीची पडताळणी करुन बनावट ग्राहक बनुन सदर बातमीची खात्री करुन द हेवन हॉटेल येथे अचानक छापा टाकुन आरोपी आदित्य अनिलकुमार सिंह, वय ३१ वर्षे, रा. साईबाबा मंदिर, जर्मन बेकरी जवळ, कोरेगाव पार्क, पुणे. यास पकडून त्याने वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या ०१ पिडीत विदेशी महिला व ०२ परराज्यातील महिलांची सुटका करण्यात आली.
सदर प्रकरणी वरील दोन्हीं आरोपींविरुध्द दि.२१/११/२०२५ रोजी कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन गु.र.नं. १३३/२०२५, अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ कलम ३,४,५, व भा. न्या. सं. कलम १४३, ३(५) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, पंकज देशमुख, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, निखील पिंगळे, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे. ३, शंकर खटके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीमती आशालता खापरे, पोलीस उप-निरीक्षक विशांत चव्हाण, पोलीस अंमलदार, दत्ताराम जाधव, बबनराव केदार, तुषार भिवरकर, ईश्वर आंधळे, इम्रान नदाफ, अमेय रसाळ, वैशाली खेडेकर, रेश्मा कंक, वैशाली इंगळे, भुजबळ गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी केली आहे.
KP मधील द हेवन हॉटेलवर छापा,विदेशी परराज्यातील महिलांकडून करवून घेतल्या जाणाऱ्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
Date:

