पुणे : जुन्या झालेल्या वन्यजीव संरक्षण कायद्यात सुधारणा करून मानव व वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
त्यासाठी सरकारने ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ माधवराव गाडगीळ यांच्याशी चर्चा करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, प्रवक्ते सुनील माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी ई –मेल द्वारे पाठवले आहे.
या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, मानवाचा पर्यावरणामध्ये अमर्यादित हस्तक्षेप सुरु झाला आहे. मानवाने बेसुमार जंगलतोड केली आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. जंगलतोड झाल्यामुळे रानडुक्कर, बिबट्या, हत्ती या सारखे वन्यप्राणी मानवी वस्तीकडे वळत आहेत. मानवी वस्तीत येऊन बिबट्या माणसांवर तसेच पाळीव प्राण्यांवर हल्ला करत आहे. त्यामुळे सध्या प्रचलित असणाऱ्या वन्यजीव कायद्यात सुधारणा करणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाने ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ डॉ. माधवराव गाडगीळ यांच्याशी चर्चा करावी. मी नुकतच त्यांच्याशी चर्चा केली, या चर्चेनुसार त्यांच्याकडे याबाबत अनेक उपाययोजना आहेत. वन्यजीव, रानडुकरे, बिबट्या यांपासून निर्माण झालेल्या प्रश्नासह, या कायद्यात काळानुरूप बदल करण्याचे त्यांचे मत आहे. आपण त्याबाबत सक्षम अधिकारी पाठवून त्यांच्याकडील माहितीनुसार कायद्यात काय बदल करवा याबाबत त्यांचा सल्ला घेऊन त्यावर लवकर निर्णय घ्यावा अशी विनंती माने यांनी केली आहे.
वन्यजीव कायद्यात सुधारणा करण्याची माने यांची मागणी पर्यावरण तज्ञ माधवराव गाडगीळ यांच्याशी चर्चा करावी
Date:

