पुणे-पुण्यात अनैतिक संबंधाच्या संशयातून एकाने चुलत भावाचा चाकूने वार करून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. खुनानंतर मृतदेह कात्रज घाटातील एका डोंगरात फेकून देण्यात आला होता. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.अशोक पंडित (वय ३५, रा. मोशी, मूळ रा. झारखंड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर अजय पंडित (वय २३, रा. खोपडेनगर, कात्रज, मूळ रा. झारखंड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.१९/११/२०२५ रोजी तक्रारदार यांनी कळविले की, त्यांचेकडील कामगार अजयकुमार गणेश पंडीत, वय २२ वर्षे रा सध्या साईनगर, खोपडेनगर, कात्रज, पुणे मुळ गाव चत्रो, जिल्हा हजारीबाग, झारखंड हा दि.१७/११/२०२५ रोजी रात्रौ २०/०० वा चे सुमा. घरामधुन भाजी घेवुन येतो असे सांगुन निघुन गेला आहे तो परत घरी आला नाही म्हणुन तक्रार दिल्याने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन मनुष्य मिसींग क्रमांक १५१/२०२५ अन्वये दिनांक १९/११/२०२५ रोजी दाखल केली आहे.
सदर घटनेच्या अनुशंगाने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देवुन, तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस अंमलदार यांना मिसींग व्यक्तीचा शोध घेणेबाबतच्या सुचना दिल्या. त्याप्रमाणे मिसींग व्यक्तीबाबत माहीती घेत असताना सदर घटनेबाबत काही संशयास्पद बाबी प्राप्त झाल्या व मिसीग मनुष्य याचे त्याचा चुलत भाऊ यांचे पत्नी सोबत अनतिक संबंध असल्यामुळे त्यांचेमध्ये वादविवाद झाले होते अशी माहीती तपास पथकातील पोलीस अंमलदार अभी चौधरी, मितेश चोरमोले यांना प्राप्त झाली. त्यापुढे अशोक पंडीत याचे मोबाईल नंबरचे तांत्रिक विश्लेषण पोलीस अंमलदार सागर बोरगे यांनी करुन तो पिपरी चिंचवड भागात असल्याची माहीती मिळाल्याने तपास पथकाचे पोलीस अंमलदार संदिप आगळे व तुकाराम सुतार यांनी पिंपरी चिंचवड भागात जावुन अशोक पंडीत याचा शोध घेतला असता तो मिळुन आला.
त्याचेकडे मिसीग व्यक्ती अजयकुमार पंडीत याचेबाबत अधिक तपास करता त्याने सांगितले की, त्याचे पत्नीचे अजयकुमार गणेश पंडीत याचे सोबत अनैतिक संबंध होते. त्या कारणावरुन दिनांक १७/११/२०२५ रोजी रात्रौ २१.३० वा. चे सुमारास खोपडे नगर येथे डोंगरामध्ये झाडीत अजयकुमार गणेश पंडीत, वय २२ वर्षे रा सध्या साईनगर, खोपडेनगर, कात्रज, पुणे मुळ गाव चत्रो, जिल्हा हजारीबाग, झारखंड यास गळ्यावर व पोटावर चाकूने वार करून ठार करून त्यास गोणीमध्ये भरून गुजर निंबाळकरवाडी डोंगरामध्ये फेकून दिले असल्याचे सांगितले. पुढे अशोक कैलास पंडीत याने गुजर, निबाळकवाडी येथील डोंगरामध्ये झाडाझुडपात मिसींग व्यक्ती अजयकुमार पंडीत याची बॉडी जेथे पोत्यामध्ये फेकली ते ठिकाण दाखविले. तेथे जावुन झाडाझुडपात पाहणी केली असता तेथे पांढरे रंगाचे गोणीच्या पोत्यामध्ये मिसींग व्यक्ती अजयकुमार पंडीत याची बॉडी मिळुन आली आहे. सदर प्रकरणी गुन्हा दाखल करुन अशोक कैलास पंडीत वय ३५ वर्षे रा. यादववाडी मोशी पुणे मुळगाव हजारीबाग झारखंड यास दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग,मनोज
पाटील, पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ मिलींद मोहीते ,सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग राहुल आवारे, यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, स.पो. निरीक्षक स्नेहल थोरात, समीर शेडे, स्वप्नील पाटील, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, रवी जाधव, पोलीस अंमलदार महेश बारवकर, मंगेश पवार, दिपक फसाळे, सचिन सरपाले, संदीप आगळे, तुकाराम सुतार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, अवधुत जमदाडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, नवनाथ खताळ, निलेश खैरमोडे, नागेश पिसाळ यांच्या पथकाने केली आहे.

