पुणे- वाहतूक समस्येचे आणि शहरी समस्येचे एकूणच मूळ बेकायदा बांधकामे ,सरकारी जमिनी लाटणे अशा बाबी मुख्यतः असताना अनेक आमदार आणि खुद्द सरकार मधील मंत्री आणि सरकार बेकायदा बांधकामांना अभय देणारे निर्णय घेत असल्याने कायदे पालीन बांधकामे करणारे मूर्ख ठरत असल्याचे स्पष्ट चित्र वर्षानुवर्षे दिसून आले आहे. पण अशा सरकारी धोरणांमुळे लोकांसाठी देखील बेकायदा बांधकामे करणे आणि जमिनी लाटणे हि सुसंधी निर्माण होत गेल्याने आणि बहुसंख्य लोक असे मार्ग स्वीकारू लागल्याने आता हि बहुसंख्यता पुन्हा मतात परिवर्तीत करणे लोकप्रतिनिधींना सुसह्य करत आहे. असे बेकायदा बांधकामात राहणारे लोक खूपच मोठ्या संख्येने असल्याने त्यांना विरोध करणे कोणाला शक्य उरले नाही उलट त्यांच्या याच गोष्टीचा राजकीय फायदा मात्र उचलणे सहज शक्य होते आहे.
कायदेशीर बांधकामे करणे किंवा विकत घेणे कसे शहराच्या हिताचे असते आणि बेकायदा बांधकामे करणे कसे घातक असते याचा प्रचार करण्या ऐवजी बेकायदा बांधकामांना खतपाणी घालणारे निर्णय केवळ मते मिळविण्याच्या स्वार्थापायी घेऊन शहरे बकाल केली जात आहेत
पुणे महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवरील तिप्पट शास्तीकर माफ करण्याची आमदार बापूसाहेब पठारे यांनी मागणी केली आहे. ज्यामुळे ज्यांनी कायदा पाळून आणि नियम पाळून बांधकामे केली किंवा अशी बांधकामे विकत घेतली ते सारे मूर्ख ठरणार असे चित्र आहे. पुणे महानगरपालिका हद्दीत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत झालेल्या अनधिकृत बांधकामांवर आकारण्यात आलेला तिप्पट शास्तीकर रद्द करण्याची मागणी वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी राज्य शासनाकडे केली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देऊन तातडीने निर्णय घेण्याचे आवाहन केले.
पुनर्विकास प्रकल्पाच्या नावाने शहरांची बकालतेकडे वाटचाल
ज्या परिसरातून पूर्वी १०० घरे होती आणि १०० वाहने रस्त्यावर बाहेर येत त्या त्या परिसरात आता पुनर्विकास प्रक्लापांच्या नावाने १०० ऐवजी हजार / हजार घरे होऊ लागली आणि तेवढीच वाहने रस्त्यावर येऊ लागली . घरे , रहिवासी दहापटीने वाढले पण रस्ते मात्र होते तेवढेच राहिले . म्हणजे ज्या रस्त्यावर ज्या सोसायटीतून १०० वाहने बाहेर येत त्या सोसायटीतून पुनर्विकास प्रकल्पा नंतर दहापट वाहने बाहेर येऊ लागली तर काय होणार ?जेवढ्या पटीने घरे वाढली तेवढ्या पटीने रस्त्यांची रुंदी होते काय ? याकडे लक्षही दिले जात नसल्याने पुण्याची वाहतूक कोंडी एकीकडे नागरिकांची छळ करणारी समस्या बनली आहे तर दुसरीकडे राजकारण्यांना हि समस्या सोडविण्याचे गाजर दाखवणाऱ्या हजारो कोटीच्या योजना आणणारी संधी ठरत आली आहे.
असे प्रकार मुंबई ,पुण्या सारखी शहरे गिळंकृत करू लागल्याने येथील पर्यावरण, प्रदूषण यावर प्रचंड परिणाम होऊन हि शहरे बकाल बनत चालली आहे याकडे कोणाला लक्ष द्यायला अवधी मिळेनासा झाला आहे. त्यापेक्षा वाहत्या गंगेत हात धूवून घ्या आणि दूरवर फार्म हाउस बांध अशी संकल्पना पुढे जोर धरू लागली. वाहतूक समस्या , चुकीच्या पद्धतीने राबविलेल्या रस्ते योजना , वाढते अपघात , वाढते प्रदूषण हे स्माप्त्तीच्या मागे धावताना शहरी जीवनमानावर जोरदार प्रघात करत आहेत आणि त्यास लोक, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन असे सारेच जबाबदार राहणार असून हे देखील त्यात भरडले जाणार असल्याचे स्पष्ट आहे.

