सुरक्षित स्वच्छता आणि सुलभ सार्वजनिक सुविधांच्या माध्यमातून ड्रायव्हर्सचे आरोग्यस्वास्थ्य उंचावणे
मुंबई, 20 नोव्हेंबर 2025: भारतातील अग्रगण्य राइडशेअरिंग प्लॅटफॉर्म ऊबर आणि स्वच्छता आणि सामाजिक सुधारणा यांचे अग्रणी सुलभ इंटरनॅशनल यांनी वर्ल्ड टॉयलेट डेच्या दिवशी ऊबर ड्रायव्हर्ससाठी स्वच्छता आणि आरामदायक सुविधा यांना चालना देत स्वच्छ आणि सुरक्षित सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये मोफत प्रवेश उपलब्ध करून देण्यासाठी सहयोग केला आहे.
या भागीदारीमुळे दिल्ली, मुंबई, बंगळुरू, हैदराबाद, पुणे, जयपूर, लखनऊ, कोलकाता आणि अहमदाबाद यांसह नऊ शहरांमध्ये सुलभद्वारे चालविल्या जाणाऱ्या सार्वजनिक स्वच्छतागृहांचा ऊबर ड्रायव्हर्सना मोफत वापर करणे शक्य होणार आहे. हा उपक्रम दोन्ही संस्थांच्या सन्मान, सर्वसमावेशन आणि सार्वजनिक आरोग्याच्या सामायिक बांधिलकीला बळकटी देत तसेच स्वच्छ भारत मिशनच्या व्यापक उद्दिष्टांना पाठिंबा देत रस्त्यावर दीर्घ काळ घालवणाऱ्या व्यक्तींसाठी स्वच्छता आणि स्वास्थ्य सुधारण्याच्या उद्देशाने केला आहे.
ऊबर ड्रायव्हर्स सुलभ संचालित केंद्रांवर ड्रायव्हर अॅपवर त्यांचा ऊबर रजिस्ट्रेशन ID दाखवून हा लाभ घेऊ शकतात. स्वच्छता, नियमित देखभाल आणि आवश्यक स्वच्छता साहित्याच्या उपलब्धतेसाठी सर्व ठिकाणांचे सुलभद्वारे व्यवस्थापन राखले जाते. महिला ड्रायव्हर्सच्या विशिष्ट गरजा ओळखून, 50 सुलभ टॉयलेट कॉम्प्लेक्समध्ये सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन आणि इन्सिनरेटरही बसविले जातील. त्यामुळे मोफत सॅनिटरी उत्पादने आणि योग्य कचरा व्यवस्थापन सुलभ होईल.
या भागीदारीबद्दल बोलताना ऊबर इंडिया अँड साऊथ एशियाच्या सिटी ऑपरेशन्सचे प्रमुख अमित देशपांडे म्हणाले, “ज्या ड्रायव्हर्सचा दिवसाचा मोठा भाग रस्त्यावर जातो, त्यांच्यासाठी स्वच्छ आणि सुरक्षित स्वच्छतागृह उपलब्ध करून देणे ही एक मूलभूत परंतु अत्यावश्यक गरज आहे. सुलभ इंटरनॅशनलसोबतच्या आमच्या सहयोगातून ड्रायव्हर्ससाठी दैनंदिन कामाच्या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी आणि स्वच्छ भारत मिशनमध्ये योगदान देण्यासाठी असलेली ऊबरची सातत्यपूर्ण बांधिलकी दिसून येते.”
सुलभ इंटरनॅशनलचे अध्यक्ष कुमार दिलीप म्हणाले, “ड्रायव्हर्सच्या सन्मान आणि आरामसुविधेला प्राधान्य देण्याच्या ऊबरच्या प्रयत्नांचे आम्ही कौतुक करतो. सुलभने नेहमीच स्वच्छता सुलभ आणि सर्वसमावेशक करण्यासाठी काम केले आहे आणि या उपक्रमाद्वारे आम्ही वेगवेगळ्या शहरांमध्ये ऊबर प्लॅटफॉर्मवरील लाखो ड्रायव्हर्ससाठी या आवश्यक सुविधांचा विस्तार करत आहोत. हे सहकार्य स्वच्छतेत सुधारणा, अधिक सुविधा आणि अधिक निरोगी, सन्मानपूर्वक कार्यशक्तीच्या निर्मितीत योगदान देते.”
भारताला गतिमान ठेवणाऱ्यांसाठी स्वच्छता स्वास्थ्य उपलब्ध करून देणे हा विशेषाधिकार नाही तर त्यांचा मुलभूत हक्कच आहे आणि तो मिळवून देण्यासाठी ऊबरची पोहोच आणि सुलभचे कौशल्य एकत्र येऊन या भागीदारीतून तंत्रज्ञान आणि सामाजिक नाविन्यपूर्णता यांच्या एकत्रित कृतीची शक्ती ठळकपणे पुढे येते.

