पुणे, दि. 19: भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरतीस इच्छुक उमेदवारांसाठी सर्विस सिलेक्शन बोर्ड (SSB) परीक्षेच्या तयारीचे निःशुल्क छात्रपूर्व प्रशिक्षण कोर्स नाशिक रोड, नाशिक येथे 15 डिसेंबर ते 24 डिसेंबर 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. प्रशिक्षण काळात प्रशिक्षणार्थींना मोफत प्रशिक्षण, निवास व भोजन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
पुणे जिल्ह्यातील पात्र व इच्छुक उमेदवारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुणे येथे 11 डिसेंबर 2025 पर्यंत मुलाखतीस उपस्थित राहावे. मुलाखतीस येताना संकेतस्थळावर उपलब्ध असलेले प्रवेशपत्र व संबंधित परिशिष्टे डाउनलोड करून तीन प्रतींसह पूर्ण भरून आणणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांच्याशी training.pctcnashik@gmail.com, दूरध्वनी 0253-2451032 किंवा 9156073306 (व्हॉट्सअॅप) या क्रमांकांवर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे यांनी केले आहे.
000

