पुणे-भारतीय महिला बेसबॉल संघाच्या कर्णधार रेश्मा पुणेकर यांचा सन्मान महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडून करण्यात आला.
पुणे महापालिकेच्या क्रीडा अधिकारी रेश्मा पुणेकर भारतीय महिला बेसबॉल संघाचे नेतृत्व करत आहेत. थायलंड देशांमध्ये झालेल्या महिला एशिया कप क्वालिफाय राऊंडमध्ये भारतीय संघाला रौप्य पदक प्राप्त झाले होते. या स्पर्धेचे नेतृत्व रेश्मा यांनीच केले. अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये तब्बल बारा वर्षे बेसबॉल खेळासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी आपले योगदान दिले आहे. आज पर्यंत राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय असे अनेक सामने खेळले आहेत. अनेक पुरस्काराची मानकरी ठरलेल्या आहेत. विशेष करून शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडू ते भारतीय बेसबॉल संघाच्या कर्णधार अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्यातून त्या भारतीय बेसबॉल संघाला पुढे घेऊन जात आहेत. चीन देशात झालेल्या एशियन कप स्पर्धेमध्ये सन्मानजनक कामगिरी केल्याबद्दल महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम व अतिरिक्त महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे साहेब यांनी आनंद व्यक्त करून त्यांचे कौतुक केले आणि रेश्मा पुणेकर (क्रीडा अधिकारी) भारतीय महिला बेसबॉल संघाच्या कर्णधार शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेत्या यांना महानगरपालिकेच्या वतीने सन्मानित करण्यात आले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
भारतीय महिला बेसबॉल संघाच्या कर्णधार रेश्मा पुणेकर यांचा सन्मान
Date:

