पुणे: आदित्य बिर्ला सन लाइफ लार्ज कॅप फंडाने ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी जवळपास ३१,०१५ कोटी रूपयांची मोठ्या प्रमाणात व्यवस्थापनापंतर्गत मालमत्ता (एयूएम) संपादित केली आहे, तसेच पुणे देशभरात सर्वाधिक योगदान देणारे शहर म्हणून उदयास आले आहे. फंडाचा पुण्यातील वाढत्या एयूएम प्रमाणामधून शहरातील गुंतवणूकदारांची लार्ज-कॅप इक्विटी धोरणांप्रती वाढती पसंती दिसून येते, ज्यामध्ये स्थिरतेसह दीर्घकालीन मालमत्ता निर्मितीचे संतुलन आहे.
पुण्यातील वैविध्यपूर्ण गुंतवणूकदार प्रोफाइलमध्ये आयटी, ऑटोमोबाइल व उत्पादन क्षेत्रांमधील व्यावसायिक, व्यवसाय मालक आणि उच्च संपत्ती असलेल्या व्यक्तींचा समावेश आहे. या गुंतवणूकदारांनी आदित्य बिर्ला सन लाइफ लार्ज कॅप फंडच्या शिस्तबद्ध गुंतवणूक दृष्टिकोनाला प्राधान्य दिले आहे. २००२ मध्ये सुरू झालेल्या (पूर्वीचा फ्रण्टलाइन इक्विटी फंड) या फंडाने बाजारपेठ चक्रामध्ये सातत्यपूर्ण कामगिरीचा प्रबळ २३ वर्षांचा ट्रॅक रेकॉर्ड स्थापित केला आहे आणि पुण्यातील गुंतणूकदारांकरिता दीर्घकालीन मालमत्ता निर्मितीसाठी पसंतीचे माध्यम बनला आहे.
२००२ मध्ये सुरू करण्यात आलेला हा फंड शाश्वत विकास क्षमता असलेल्या उच्च दर्जाच्या लार्ज-कॅप कंपन्यांमधील त्याच्या पोर्टफोलिओवर लक्ष केंद्रित करतो. हा फंड ग्रोथ अॅट रिझनेबल प्राइम (जीएआरपी) तत्त्वाचे पालन करतो आणि मजबूत जोखीम व्यवस्थापन आराखड्याचा वापर करतो. पोर्टफोलिओ रचनेमध्ये व्यापक क्षमता, शक्तिशाली व्यवस्थापन, सर्वोत्तम प्रशासन आणि सातत्यपूर्ण रोखप्रवाह असलेल्या आघाडीच्या व्यवसायांवर भर दिला जातो, ज्यामधून अस्थिर बाजारपेठांमध्ये देखील स्थिरतेची खात्री मिळते.
आदित्य बिर्ला सन लाइफ लार्ज कॅप फंडाने सतत विविध कालावधींमध्ये बेंचमार्क इंडेक्सना मागे टाकले आहे आणि ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी ३ वर्षांमध्ये व ५ वर्षांमध्ये अनुक्रमे १८ टक्के आणि १७ टक्के परतावे दिले आहेत.
या फंडाच्या कामगिरीबाबत मत व्यक्त करत आदित्य बिर्ला सन लाइफ एएमसी लि.चे सीआयओ श्री. महेश पाटील म्हणाले, ”आदित्य बिर्ला सन लाइफ लार्ज कॅप फंड गुंतवणूकदारांना उच्च दर्जाच्या लार्ज-कॅप रिडर्समध्ये स्थिरता व शाश्वत वाढ देण्यासाठी, तसेच उत्तम संधी देण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे. पुण्याच्या वाढत्या योगदानामधून निदर्शनास येते की पुण्यातील गुंतवणूकदार दीर्घकालीन सातत्यता, मुलभूत तत्त्वे आणि शिस्तबद्ध मालमत्ता निर्मितीला महत्त्व देतात. तसेच यामधून दिसून येते की, गुंतवणूकदांना मुलभूत तत्त्वे आणि प्रशासनाचे पाठबळ असलेल्या शिस्तबद्ध मालमत्ता निर्मितीमध्ये आत्मविश्वास आहे.”
सुरुवातीला १ लाख रूपयांची एकरकमी गुंतवणूक जवळपास ५४ लाख रूपयांपर्यंत वाढू शकते. तसेच, १०,००० रूपयांची मासिक एसआयपी २३ वर्षांमध्ये जवळपास २.५ कोटी रूपयांपर्यंत वाढू शकते. पुणे सर्वात मोठे योगदानकर्ते शहर असल्यामुळे आदित्य बिर्ला सन लाइफ लार्ज कॅप फंडाच्या वाढीमधून दर्जेदार, संशोधनाचे पाठबळ असलेल्या धोरणांप्रती गुंतवणूकदारांच्या वर्तणूकीमधील मोठा बदल दिसून येतो, जेथे या धोरणांमधून स्थिरतेसह शाश्वत मालमत्ता निर्मितीची खात्री मिळते. तसेच यामधून निदर्शनास येते की, पुण्यातील गुंतवणूकदार फंडाचे देशभरातील नेतृत्व आणि दीर्घकालीन गतीला आकार देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

