पुणे, मूळ पुण्यातील असलेल्या आणि आता मुंबई आणि बेंगळुरूमध्ये आघाडीवर असलेली रिअल इस्टेट कंपनी कोलते-पाटील डेव्हलपर्स लिमिटेडला (BSE: 532924, NSE: KOLTEPATIL) ब्लॅकस्टोनचे भक्कम पाठबळ मिळाले आहे. यामुळेच वाढीच्या नवीन धोरणाशी सुसंगत होण्यासाठी व्यापक संघटनात्मक बदलाचा भाग म्हणून त्यांनी त्यांच्या नेतृत्व टीम तसेच बोर्डाची पुनर्रचना करण्याची घोषणा केली.
संचालक मंडळात काही नवीन बदल:
11 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत, शेअरहोल्डर्सच्या मान्यतेनुसार अवनी दावडा यांची अतिरिक्त संचालक (गैर-कार्यकारी, स्वतंत्र) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दावडा या दोन दशकांहून अधिक अनुभव असलेल्या एक कुशल व्यावसायिक आहेत आणि रिअल इस्टेट, ग्राहक, किरकोळ विक्री तसेच आतिथ्य क्षेत्रातील कंपन्यांमध्ये नेतृत्व आणि संचालकपदाची पदे त्यांनी भूषवली आहेत. व्यवसायिक धोरणे यशस्वीरित्या राबवण्याचा त्यांचा उत्तम अनुभव आहे. सध्या, त्या बेन अॅडव्हायझरी नेटवर्कमध्ये धोरणात्मक सल्लागार म्हणून कार्यरत आहेत आणि आशियातील किरकोळ विक्री तसेच ग्राहक क्षेत्रातील अनेक प्रकल्पांचे नेतृत्व केले आहे. इमामी लिमिटेड, महिंद्रा लॉजिस्टिक्ससह अन्य कंपन्यांच्या संचालक मंडळावर देखील त्या आहेत. यापूर्वी ज्या कंपन्यांमध्ये त्यांनी नेतृत्व केले आहे, त्यात टाटा स्टारबक्स, टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड आणि त्यांच्या उपकंपन्या (TCPL), द इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड (TAJ हॉटेल्स), इन्फिनिटी रिटेल (क्रोमा) आणि गोदरेज नेचर बास्केट यांचा समावेश आहे. त्यांच्या कामगिरीची आंतरराष्ट्रीय स्तरावरही दखल घेण्यात आली आहे. यात मध्ये 2013 मध्ये फॉर्च्यून यूएसच्या ’40 अंडर 40 लीडर्स’ च्या वार्षिक जागतिक यादीत स्थान मिळवण्याचा समावेश आहे.
ऑगस्ट 2025 मध्ये, कंपनीने ब्लॅकस्टोनच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना संचालक (नॉन-एक्झिक्युटिव्ह, नॉन-इंडिपेंडंट) म्हणून त्यांच्या मंडळात समाविष्ट करण्याची घोषणा केली – श्री. तुहिन पारिख, रिअल इस्टेटचे उपाध्यक्ष (आशिया) आणि रिअल इस्टेटचे कार्यकारी अध्यक्ष; श्री. आशिष मोहता, वरिष्ठ व्यवस्थापकीय संचालक आणि रिअल इस्टेटचे प्रमुख (भारत); आणि मोहित अरोरा, रिअल इस्टेट ग्रुपचे (भारत) व्यवस्थापकीय संचालक.
नेतृत्वात बदल:
याबरोबरच कंपनीने आज त्यांच्या वरिष्ठ स्तरावरील नेतृत्वात बदलांची घोषणा केली. ग्रुप सीईओ श्री. अतुल बोहरा यांनी 11 नोव्हेंबर 2025 रोजी राजीनामा दिला आहे. कामकाजाचे तास संपल्यानंतर त्यांचा राजीनामा लागू होईल. नवीन सीईओ म्हणून योग्य उमेदवार निवडण्यासाठी संचालकांचे प्रयत्न सुरू आहेत. व्यवस्थापकीय संचालक. राजेश पाटील हे व्यवसायाचे प्रमुख राहतील. कंपनी आणि संचालक मंडळाने श्री. बोहरा यांच्या योगदानाची प्रशंसा करत त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कंपनीने श्री. अनिल द्विवेदी यांची मुख्य विकास अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून ते या महिन्याच्या अखेरीस जबाबदारी स्वीकारतील. भारतीय रिअल इस्टेट आणि बांधकाम उद्योगात त्यांनी ३० वर्षांहून अधिक काळ सर्वोत्तम कामगिरी केली आहे. त्यांचा व्यावसायिक प्रवास सातत्यपूर्ण आणि यशस्वी नेतृत्वाचा निदर्शक आहे. निवासी, व्यावसायिक, किरकोळ, हॉस्पिटॅलिटी, संस्थात्मक, औद्योगिक आणि गोदाम क्षेत्रातील 30 दशलक्ष चौरस फूट पेक्षा जास्त प्रकल्पांचे एंड-टू-एंड वितरण केले आहे. कोलते-पाटील डेव्हलपर्समध्ये सहभागी होण्यापूर्वी ते कॉलियर्समध्ये वेस्टर्न इंडिया प्रोजेक्ट मॅनेजमेंटचे व्यवस्थापकीय संचालक होते.
श्री. विशाल मारिया यांची कंपनीने ग्रुप चीफ ह्युमन रिसोर्सेस ऑफिसर म्हणून नियुक्ती केली आहे. श्री. मारिया यांना लोककेंद्रित संघटना उभारण्याचा, सांस्कृतिक परिवर्तन घडवून आणण्याचा आणि एफएमसीजी, रिअल इस्टेट, मॅन्युफॅक्चरिंग आणि ईपीसी सारख्या विविध उद्योगांमधील कंपन्यांमध्ये नेतृत्व करण्याचा 18 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. कोलते-पाटील डेव्हलपर्समध्ये सहभागी होण्यापूर्वी ते केईसी इंटरनॅशनल लिमिटेडमध्ये मनुष्यबळ विकास विभागाचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. सीएट टायर्स, रेकेम आरपीजी, गोदरेज प्रॉपर्टीज आणि गोदरेज कंझ्युमर प्रोडक्ट्स सारख्या कंपन्यांमधील त्यांचा कार्यकाळ त्यांच्या या क्षेत्रातील सखोल कौशल्याचे प्रतिबिंब आहे.
प्रमोटरचा अंमलबजावणी ट्रॅक रेकॉर्ड आणि ब्लॅकस्टोनच्या मालमत्ता वर्गांमधील जागतिक कौशल्यासह एकत्रित करत सुधारित प्रशासन संरचना कंपनीला प्रगतीच्या मार्गावर सातत्यपूर्ण वाटचाल करण्यास सक्षम करेल.
या घडामोडींबाबत कोलते-पाटील डेव्हलपर्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री. राजेश पाटील म्हणाले, “बोर्ड आणि नेतृत्वातील बदल भविष्यासातील आमच्या महत्त्वाकांक्षा तसेच एक मजबूत व्यवस्थापन संघ तयार करण्याच्या आमच्या अढळ वचनबद्धतेवर प्रकाश टाकतात. गेल्या काही वर्षांतील आमच्या उत्तम कामगिरीमुळे पुणे, मुंबई आणि बेंगळुरूमध्ये प्रकल्पांचा एक मजबूत पोर्टफोलिओ तयार करण्यास मदत झाली आहे. आता, ब्लॅकस्टोनच्या परिवर्तनकारी पाठिंबा आणि भक्कम आर्थिक परिस्थितीमुळे, कोलते-पाटील डेव्हलपर्स त्यांच्या वाढीच्या पुढील टप्प्यासाठी सज्ज आहे.”
ब्लॅकस्टोनमध्ये रिअल इस्टेट (भारत) प्रमुख आणि कोलते-पाटील डेव्हलपर्स लिमिटेडच्या संचालक मंडळाचे सदस्य श्री. आशीष मोहता म्हणाले, “कोलते-पाटील डेव्हलपर्समधील आमची गुंतवणूक आणि त्यांच्या सोबतच्या धोरणात्मक भागीदारीबद्दल आम्हाला खूप आनंद होत आहे. वेगाने वाढीच्या क्षमतेसह ही एक असाधारण संधी आहे. भारताच्या रिअल इस्टेट क्षेत्रासाठी आमची भागीदारी हे दीर्घकालीन वचनबद्धतेचे प्रतिनिधित्व करते. ब्लॅकस्टोनचे जागतिक कौशल्य आणि कोलते-पाटीलच्या अंमलबजावणी क्षमतांची यात उत्तम सांगड घालण्यात आली आहे. बोर्ड आणि नेतृत्व रचनेतील सुधारणा कंपनीला उदयोन्मुख संधींचा फायदा घेण्यास, तिच्या प्रगतीला गती देण्यास आणि उद्योगातील सर्वात प्रभावी तसेच सन्मानजनक प्लॅटफॉर्मपैकी एक बनवण्याचे आमचे सामायिक ध्येय साध्य करण्यास सक्षम करेल.”

