पुणे-सिंहगड कॉलेज कॅम्पसमधीलपायगुडे इमारतीच्या पहील्या मजल्यावरील फ्लॅट नंबर २४ मध्ये आणि ‘रुट २४ हॉटेल’च्या हुक्का पार्लर्सवर छापा मारून पोलिसांनी सौरभ प्रकाश फडके, वय २७ वर्षे, रा. आशावरी कुंज अपार्टमेन्ट, नवले पुलाशेजारी, फ्लॅट नंबर २०३, ए विंग, वडगाव, पुणे आणि प्रितम अरुण कोयले, वय ३२ वर्षे, रा. दत्तनगर, टेक्लो कॉलनी, पुणे.प्रतिक जयंत गोळे, वय ३४ वर्षे, धंदा हॉटेल व्यवसाय, रा. ८५८/८६१ गुरुवार पेठ, या हॉटेल मालकांना अटक केली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी सांगितले कि,’१५/११/२०२५ रोजी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक गणेश मोहीते, पोलीस उप-निरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस अंमलदार हे पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असताना गोपनीय बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, सिंहगड कॉलेज कॅम्पसमधील पायगुडे इमारतीच्या पहील्या मजल्यावरील फ्लॅट नंबर २४ मध्ये इसम नामे १. सौरभ प्रकाश फडके, वय २७ वर्षे, रा. आशावरी कुंज अपार्टमेन्ट, नवले पुलाशेजारी, फ्लॅट नंबर २०३, ए विंग, वडगाव, पुणे २. प्रितम अरुण कोयले, वय ३२ वर्षे, रा. दत्तनगर, टेक्लो कॉलनी, पुणे. हे त्यांचे अर्थिक फायदयाकरता मानवी आरोग्यास धोकादायक अथवा अपायकारक असा हुक्का फ्लेवर्स धुम्रपानासाठी ग्राहकांना सेवन करण्यासाठी देत आहे. मिळालेल्या बातमीवरुन पोलीस अधिकारी व पोलीस स्टाफ तात्काळ या ठिकाणी गेले असता सदर आरोपी मिळुन आले. तसेच इसम नामे प्रतिक जयंत गोळे, वय ३४ वर्षे, धंदा हॉटेल व्यवसाय, रा. ८५८/८६१ गुरुवार पेठ, पुणे हा त्याचे रुट २४ हॉटेल, सिंहगड कैम्पस, वडगाव, पुणे. या हॉटेलमध्ये त्यांचे अर्थिक फायदयाकरता मानवी आरोग्यास धोकादायक अथवा अपायकारक असा हुक्का फ्लेवर्स धुम्रपानासाठी ग्राहकांना सेवनाकरता ठेवला असताना मिळुन आला म्हणुन त्याचेविरुध्द सरकारतर्फे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गु.र.नं. ५०८/२०२५ भा.न्या.सं.क.१२३, सिगारेट व अन्यतंबाखुजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम २०१८ चे कलम ४-अ, २१-अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन दि.१५/११/२०२५ रोजी या आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, राजेश बनसोडे, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ २, पुणे शहर, मिलींद मोहीते, सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे शहर, राहुल आवारे, यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, सहा. पोलीस निरीक्षक गणेश मोहीते, पोलीस उप-निरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार यांनी केली.

