पुणे-
पुण्यातील मुंबई-बंगळुरु महामार्गावरील नवले पुलाजवळ आज पुन्हा एकदा अपघात झाला. सोमवारी दुपारी एका भरधाव कंटेनरने पाच ते सहा वाहनांना धडक दिली. पण सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र वाहनांचे मोठे नुकसान झाले.परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास नवले पुलाजवळील भुमकर चौकात घडला. कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने थार, एर्टिगा, निशाण, बोलेरो, पिकअप आणि इतर काही वाहनांना मागून जोरदार धडक दिली.या अपघातामुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त कंटेनर ताब्यात घेतला असून चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
नवले पुलाजवळ पुन्हा अपघात
Date:

