Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पुण्यात गोदरेज कॅपिटल कंपनीच्या उपकंपनीची पहिली महिला गृहवित्त शाखा कार्यान्वित

Date:

• कंपनीने सहा महिन्यांच्या आत पुण्यात दुसरे परवडणारी घरे देणारे वित्तीय केंद्र उभारुन कंपनीच्या सर्वसमावेशक विकासावर भर दिला आहे.

• .ही शाखा रांजणगाव, कात्रज, लोणीकंद, शिक्रापूर यांसह नजीकच्या परिसरातील गृहकर्ज प्रक्रियेसाठी उपयुक्त ठरेल. शाखेतील महिला कर्मचा-यांच्या पुढाकाराने स्थानिकांना परवडणा-या गृहवित्त सेवांचा थेट लाभ घेणे सुलभ होईल.

पुणे – गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपची वित्तीय सेवा शाखा असलेल्या गोदरेज कॅपिटलने आज नवी घोषणा केली. गोदरेज हाऊसिंग फायनान्स या उपकंपनीच्या माध्यमातून गोदरेज कॅपिटल आरोही उपक्रम राबवते. आता या उपक्रमांतर्गत पुण्यातील पहिली सर्व महिला कर्मचारी असलेली गृह वित्त शाखा सुरु केली जाणार असल्याचे गोदरेज कॅपिटलने जाहीर केले. पुण्यातील खराडी येथे ही शाखा उभारण्यात आली आहे. गोदरेज हाऊसिंग कंपनीने पुण्यात अवघ्या सहा महिन्यांच्या आत दुसरी परवडणारी गृह वित्त शाखा उभारली आहे. कंपनीचा हा पुढाकार त्यांची शहरातील प्रमुख बाजारपेठेत त्यांची वाढती उपस्थिती तसेच सर्वसमावेशकता आणि सुलभता यावरील निरंतर भर दर्शवते. 

नवीन शाखेचे संपूर्ण व्यवस्थापन, कामकाज, विक्री, कर्जविभाग आणि ऑपरेशन्स अशा विविध भागांमध्ये कार्य करणा-या दहा महिला व्यावसायिकांच्या टीमद्वारे केले जाईल. विविध प्रकारच्या ग्राहकांना सेवा देणारी ही शाखा आर्थिक क्षेत्रात महिलांचे प्रतिनिधित्व वाढवण्यात कंपनीची बांधिलकी दर्शवते. येत्या काळात कंपनी या उपक्रमाचा विस्तार करुन बीएफएसआय क्षेत्रात सक्षम कौशल्यपूर्ण आणि भविष्यासाठी तयार अशा महिला व्यावसायिकांची मजबूत फळी तयार करण्याची योजना आखत आहे.

खराडी येथील शाखा नजीकच्या रांजणगाव, कात्रज, पीसीएमसी, लोणीकंद, शिक्रापूर, लोणी काळभोर, उरळी कांचन, शिरुर आणि नजीकच्या विकसनशील प्रदेशांसाठी उपयुक्त ठरेल. पगारदार तसेच स्वयंरोजगार असलेल्या अर्जदारांसाठी ५ लाखांपासून सुरु होणारे आणि ३० वर्षांपर्यंत कालावधी असलेले परवडणारे गृहनिर्माण कर्ज दिले जाईल. कंपनीच्या वितरण-केंद्रित कार्यपद्धतीला पुढे नते ही शाखा कनेक्टर्स, बिल्डर्स आणि चॅनेल पार्टनर्सचे जाळे अजून मजबूत करुन तुलनेने कमी सेवा मिळणा-या सूक्ष्म-बाजारांपर्यंत परवडणारे गृहवित्त सहज उपलब्ध देण्याकरिता प्रयत्नशील राहील. या उपक्रमाद्वारे विशेषतः महिलांसह सर्व इच्छुक गृहस्वाम्यांना त्यांच्या स्वतःच्या कायमस्वरुपी घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सक्षम करणे हा कंपनीचा मुख्य उददेश आहे. #PakkaPatta.

महिला नेतृत्वाच्या सेवा देण्याच्या उपक्रमामुळे ग्राहकांशी संवाद विकसित करण्याचे उद्दिष्ट साधले जाईल, कामकाजातील कार्यक्षमता वाढेल, परिणामी कर्जप्रक्रिया जलदगतीने पार पडेल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला. या शाखेत ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार वैयक्तिक, अधिक काळजीपूर्वक सेवा उपलब्ध केली जाईल. महिला कर्जदारांसाठी विशेष व्याजदरांची सुविधा देऊन कंपनी सर्वसमावेशक आर्थिक विकासासाठीची आपली बांधिलकी अधिक दृढ करत आहे.पुण्यात गृहनिर्माण क्षेत्रातील विकास लक्षात घेता ही नवी शाखा उभारली गेल्याची माहिती गोदरेज हाऊसिंग फायनान्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी मेहरनोष टाटा म्हणाले, “पुण्यात परवडणा-या घरांची मागणी वाढत आहे. ही मागणी ध्यानात घेत आम्ही अफोर्डेबल हाऊसिंग फायनान्सची दुसरी शाखा उभारली आहे. सहा महिन्यांच्या आत ही दुसरी शाखा उभारली गेली. नव्याने उदयास येणा-या मोठ्या बाजारपेठांमध्ये उपस्थिती मजबूत करण्याची आमचे प्रयत्न या पुढाकारातून दिसून येतात. आरोही उपक्रमांतर्गत पहिली शाखा असल्याने तसेच शाखेत सर्वच महिला कर्मचारी असल्याने या शाखेचे महत्त्व जास्त आहे. ही शाखा आमच्या उद्देशाकडे विकसित होणारी वृद्धी दर्शवते. आरोहीच्या माध्यमातून आम्ही महिलांना नेतृत्वाची आणि प्रगतीची अर्थपूर्ण संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरात अधिकाधिक कुटुंबाना स्वतःचे घर विकत घेण्याचे स्वप्न पूर्ण करता यावे याकरिता आम्ही सदैव प्रयत्नशील राहू.”

आरोही हे गोदरेज कॅपिटलचे सर्वसमावेशक मुख्य व्यासपीठ मानले जाते. महिला या कर्जदार, कर्मचारी, भागीदारक तसेच समुदाय नेते म्हणून घडण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे. आर्थिक समावेशन, समतोल पातळीवर रोजगाराच्या संधी, कौशल्यविकास आणि धोरणात्मक सहकार्य या चार मुख्य आधारस्तंभावर आरोही उपक्रमाचा पाया रोवला गेला आहे. या चार आधारस्तंभाच्या आधारे आर्थिक क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढावा याकरिता कंपनीकडून विविध उपाययोजना राबवल्या जातात. आरोही उपक्रमाच्या सुरुवातीपासून महिलांसाठी १ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक कर्जाचे वितरण झाले आहे. येत्या पाच वर्षांच्या काळात कंपनी १ लाखांहून अधिक महिलांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम घडवण्याचे उद्दिष्ट ठेवत असल्याचे कंपनीच्यावतीने सांगण्यात आले.

आर्थिक तज्ज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, आर्थिक वर्ष २०२४-२५मध्ये गृहकर्ज वितरणांपैकी २० टक्के कर्ज महिलांना दिली गेली. या आकडेवारीतून, महिलांचा आर्थिक घडामोडीतील आणि घरमालकीमिळवण्याची आवड स्पष्ट होते. देशपातळीवर, महाराष्ट्र राज्य महिलांना गृहकर्ज देण्यात आघाडीचे राज्य ठरले. महाराष्ट्रात आर्थिक वर्ष २०२४-२५मध्ये दिलेल्या एकूण कर्जांपैकी २८ टक्के वाटा महिलांचा दिसून आला. महाराष्ट्रात पुणे हे महत्त्वाचे शहर मानले जाते. पुण्यातील वाकड, बाणेर आणि खराडीसारख्या मध्यम उत्पन्न आणि आयटी केंद्रित भागांमध्ये महिला कर्जदारांचा सहभाग सातत्याने वाढत आहे. हा वाढता सहभाग लक्षात घेत पुण्यात आरोहीची नवी महिला केंद्रित शाखा सुरु करणे ही वेळ योग्य ठरल्याचे कंपनीने स्पष्ट केले. हा उपक्रम महिलांना गृहवित्त प्रक्रिया सुलभ करुन देतो. वित्तीय क्षेत्रात योगदान देण्याकरिता उत्तम नेतृत्वगुण आणि प्रगती साधण्याची संधीही देतो.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापालिकेतील दोन कर्मचाऱ्यांना ड्युटीवर असताना हृदयविकाराचा झटका; एकाचा मृत्यू

पुणे : महापालिकेच्या इमारतीमध्ये आज दिवसभरात दोन कर्मचाऱ्यांना हृदयविकाराचा...

पुतिन यांची कार चालता-फिरता किल्ला आहे, बसल्या बसल्या करू शकतात अणुबॉम्ब हल्ला,ती सोडून पुतीन बसले मोदींच्या कार मध्ये…

रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारतात पोहोचताच सुरक्षा प्रोटोकॉल...

पुतिन भारतात पोहोचताच PM मोदींनी घेतली गळाभेट

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारतात आले आहेत. पंतप्रधान मोदींनी...

शिवसेनेने फुंकले महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग!

दत्त जयंतीच्या शुभमुहूर्तावर उमेदवारी अर्ज वाटपाची सुरुवात पुणे – पुणे...