Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

महिंद्रा लास्ट माईल मोबिलिटी लिमिटेडने 3 लाख ईव्हीचा टप्पा ओलांडला

Date:

·         केवळ 12 महिन्यांत 1 लाख ईव्ही विक्रीचा आकडा गाठला, जो मार्केटची मजबूत स्वीकृती दर्शवितो.

·         या ईव्हींनी 5 अब्ज किलोमीटरपेक्षा जास्त अंतराचा प्रवास केला आहे, महत्त्वाचे म्हणजे यामुळे 185 किलो मेट्रिक टन पेक्षा जास्त CO₂ उत्सर्जनाची भरपाई केली आहे.

मुंबई17 नोव्हेंबर 2025: महिंद्रा लास्ट माईल मोबिलिटी लिमिटेडने (एमएलएमएमएल) आजपर्यंत 3 लाखांहून अधिक इलेक्ट्रिक वाहनांची विक्री करत भारतातील आघाडीची व्यावसायिक ईव्ही उत्पादक म्हणून आपले स्थान मजबूत केले आहे. एमएलएमएमएल ही भारतातील पहिली ओईएम आहे ज्याने हा टप्पा गाठला आहे. कंपनीच्या या कामगिरीमुळे व्यावसायिक ईव्ही क्षेत्रात पर्यावरणपूरक वाहतूक आणि नावीन्यपूर्णतेमध्ये नवीन बेंचमार्क स्थापित झाले आहेत. तसेच कंपनी भारतातील सर्वात विस्तृत इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहन पोर्टफोलिओ ऑफर करते, ज्यामध्ये ट्रिओ श्रेणीझोर ग्रँडई-अल्फा 3-व्हीलर्स आणि महिंद्रा झिओ फोर-व्हीलर यांचा समावेश आहे. या ईव्हींनी एकत्रितपणे 5 अब्ज किलोमीटरपेक्षा जास्त अंतराचा प्रवास केला आहे. यामुळे 185 किलो मेट्रिक टन पेक्षा जास्त CO₂ उत्सर्जनाची भरपाई केली आहे. दुसऱ्या शब्दात हे उत्सर्जन 4.3 दशलक्ष झाडे लावण्याच्या पर्यावरणीय फायद्याएवढे असल्याचा अंदाज आहे.

प्रामुख्याने ईव्हीवर लक्ष केंद्रित करून शेवटच्या टप्प्यापर्यंत हा प्रवास सुरळीत राहील यासाठी एमएलएमएमएल सातत्याने प्रयत्नशील आहे. तसेच ग्राहकांच्या पसंतीस उतरेल अशी परिसंस्था विकसित करण्यासाठी अनेक भागीदारांसोबत एकत्रितपणे काम करत आहे.

कंपनीच्या प्रगतीने चांगलाच वेग पकडला आहे. गेल्या अवघ्या 12 महिन्यांत 1 लाख ईव्ही विकल्या गेल्या आहेत, ज्यामुळे महिंद्राच्या इलेक्ट्रिक वाहनांवरील ग्राहकांचा विश्वास आणि त्यांना मिळत असलेली पसंती अधोरेखित होते. नवोपक्रमांना प्राधान्य आणि ग्राहकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादाच्या आधारे, एमएलएमएमएलने गेल्या दोन वर्षांत नवीन तसेच अपग्रेडेड उत्पादने लाँच केली आहेत. यामध्ये ट्रिओ प्लस शीट मेटलई-अल्फा प्लसझोर ग्रँड रेंज प्लस आणि महिंद्रा झिओ यांचा समावेश आहे.

गेल्या वर्षी 2 लाख ईव्हींचा टप्पा गाठल्यानंतर, एमएलएमएमएलने त्यांचा ग्राहक-केंद्रित उदय एनएक्सटी उपक्रम सादर केला जो ड्रायव्हरच्या सक्षमीकरणासाठी वचनबद्ध असल्याचे दर्शवतो. ज्यामध्ये 20 लाख रुपयांचे अपघाती विमा कव्हर आणि आर्थिक समुपदेशन असे फायदे मिळतात. 3 लाख ईव्हीच्या टप्प्यासाठी, एमएलएमएमएलने iOS, Android आणि वेबवर नवीनतम NEMO प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे. ड्रायव्हर्स आणि फ्लीट मॅनेजर्सना त्यांच्या वाहनांचे दूरस्थपणे व्यवस्थापन आणि निरीक्षण करण्यास NEMO प्लॅटफॉर्म सक्षम करतो. प्रमुख नवीन वैशिष्ट्यांमध्ये एकाच ऍपमध्ये मल्टी-व्हेइकल व्यवस्थापन, जिओ-ट्रॅकिंग, सर्व्हिस बुकिंग, रोडसाईड असिस्टन्स (RSA), विस्तृत चार्जिंग नेटवर्क लोकेशन्स आणि अन्य बऱ्याच गोष्टींचा समावेश  आहे. हे उपक्रम गतिशीलता वाढवण्याचे आणि वाहनाच्या पलीकडे अतुलनीय संधी देण्याचे महिंद्राचे सर्वसमावेशक ध्येय अधोरेखित करतात.

महिंद्रा लास्ट माईल मोबिलिटीच्या व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ सुमन मिश्रा म्हणाल्या, “पर्यावरणपूरक गतिशीलतेच्या दिशेने सुरू असलेल्या आमच्या प्रवासात 3 लाख ईव्हीचा टप्पा गाठणे हा एक अभिमानास्पद क्षण आहे. ग्राहकांनी आमच्या ईव्हीवर ठेवलेल्या विश्वासाचे हे प्रतिबिंब आहे. महिंद्रा लास्ट माईल मोबिलिटीमध्ये आम्ही केवळ ईव्हीचे उत्पादन करत नाही तर आम्ही रोजगार निर्मिती करतो आणि स्वच्छ भविष्याचा पाया रचतो आहोत. अशा नावीन्यपूर्ण उत्पादनांद्वारे आम्ही इलेक्ट्रिक मोबिलिटी व्यावहारिक आणि प्रत्येकासाठी उपलब्ध करून देण्याची आमची वचनबद्धता मजबूत करत आहोत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापालिकेतील दोन कर्मचाऱ्यांना ड्युटीवर असताना हृदयविकाराचा झटका; एकाचा मृत्यू

पुणे : महापालिकेच्या इमारतीमध्ये आज दिवसभरात दोन कर्मचाऱ्यांना हृदयविकाराचा...

पुतिन यांची कार चालता-फिरता किल्ला आहे, बसल्या बसल्या करू शकतात अणुबॉम्ब हल्ला,ती सोडून पुतीन बसले मोदींच्या कार मध्ये…

रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारतात पोहोचताच सुरक्षा प्रोटोकॉल...

पुतिन भारतात पोहोचताच PM मोदींनी घेतली गळाभेट

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारतात आले आहेत. पंतप्रधान मोदींनी...

शिवसेनेने फुंकले महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग!

दत्त जयंतीच्या शुभमुहूर्तावर उमेदवारी अर्ज वाटपाची सुरुवात पुणे – पुणे...